गोवा

नव्या संसद भवनसाठी गोव्यातील माती नवी दिल्लीत

पणजी :
नवी दिल्लीस्थित नव्या संसद भवनासाठी गोवा राज्यातील माती दिल्लीला पाठवण्याचे नियोजीत होते. त्याप्रमाणे आता ही माती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांच्याकडे नवी दिल्ली येथे सुपुर्द केली.

देशाला 75 वर्षे पुर्ण होत असल्याने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारतच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गोव्यातील माती नवी दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पासाठी नवीन संसद भवनासाठी पाठवण्यात आली आहे. या उपक्रमाचे गोव्यात भाजप नेत्यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: