google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

मोदींची दोहा भेट आणि कतार एअरवेजचे मोपा स्थलांतर यांचे कनेक्शन आहे ?

मडगाव :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहाला भेट दिल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच कतार एअरवेजने दाबोळीवरुन मोपा येथे आपली विमानसेवा हलवण्याची घोषणा केली. 2 दिवसांनंतर परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी जीएमआरने दिल्लीतील भाजप सरकारवर दबाव आणल्याचे वक्तव्य केले. एकंदर घटनाक्रमावरून दाबोळी बंद पाडण्याचा कट उघड झालाय, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

 

14 आणि 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतार भेटीनंतर घडलेल्या घटनाक्रमातून भाजप सरकारचा श्रीमंत समर्थक आणि गरीब विरोधी अजेंडा स्पष्टपणे दिसून येत आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला आहे.

जीएमआरच्या दबावाखाली येवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतार सरकारसमोर कतार एअरवेजला त्यांचे ऑपरेशन मोपा येथे हलवण्याची विनंती केली असावी असे माझे ठाम मत आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबला खूश करण्यासाठी भाजप सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दाबोळी विमानतळावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या गोमतकीयांच्या उपजीविकेची पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंत यांना चिंता नाही, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने कतार एअरवेजच्या एकंदर व्यवहारावर आणि दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. या गंभीर मुद्द्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच खुलासा करणे गरजेचे आहे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.

गोमंतकीयांनी भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांच्या मोहात पडू नये. गोव्यातील जमीनी मोदी आणि शहा यांच्या क्रोनी भांडवलादारांच्या घशात घालण्यात भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. गोमंतकीयांनी भाजपला कायमचा धडा शिकवावा, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!