google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

Panaji Bus Route: पणजीतील बस मार्गांचे 19 जानेवारीपर्यंत राष्ट्रीयीकरण करणार

Panaji Bus Route: राज्य सरकारने पणजीतील सर्व शहरी बस मार्गांचे राष्ट्रीयीकरण तसेच राजधानी ते सांता क्रुझ, ताळगाव, बांबोळी आणि दोना पावला यांसारख्या उपनगरातील मार्गांचे पुढील वर्षी 19 जानेवारीपर्यंत राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रस्ताव केला आहे.

सध्या कार्यरत असलेल्या 57 खासगी बस परमिटधारकांना नोटीस बजावली आहे. स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत शहर बस सेवा राज्याच्या मालकीच्या कदंब परिवहन महामंडळ लिमिटेड (KTCL) द्वारे IPSCDL साठी चालवली जाईल. यात नवीन मोठ्या इलेक्ट्रिक बसेस (49 आसनी), डिझेलवर चालणाऱ्या मिनी बसेस (30 आसनी), मिनी बसेस (२६ आसनी), इलेक्ट्रिकल मायक्रो बसेस (१४ आसनी) आणि इलेक्ट्रिक बग्गी (११ आसनी) इलेक्ट्रिकल बसेसचाही समावेश असेल.

हा परिवहन सेवेचा प्रस्ताव परिवहन संचालक पी. प्रविमल अभिषेक IAS यांनी जारी केलेल्या विस्तृत अधिसूचनेत समाविष्ट आहे. बस वातानुकूलित आहे की नाही यावर 10 आणि 20 रुपये प्रस्तावित मानक भाडे आकारले जातील.

या प्रस्तावात सात मार्ग आहेत. पहिला KTC बसस्थानकावरून पर्यटन भवन, आझाद मैदान, कला अकादमी, सांत इनेज काकुलो सर्कल आणि इमॅक्युलेट चर्च आणि पाटो सर्कल मार्गे केसीटी बस स्टँड असा आहे.

दुसरा मार्ग पणजी बसस्थानक ते बांबोळी (गोवा विद्यापीठ) मार्गे GHSSIDC मुख्यालय, सांत क्रुझ चर्च, गोवा मेडिकल कॉलेज, गोवा विद्यापीठ, दोना पावला NIO सर्कल, मिरामार, कला अकादमी, दिवजा सर्कल आणि परत पणजी बसस्थानकाकडे असा आहे.

तिसरा मार्ग पणजी म्युनिसिपल मार्केटमधून मिरामार, करंजाळे, ताळगाव, काकुलो मॉल मार्गे परेड ग्राऊंडपर्यंत आहे.

चौथा मार्ग पणजी बसस्थानक ते बहु-स्तरीय कार पार्क, जुने सचिवालय ते दूरदर्शन आणि अल्तिन येथील जॉगर्स पार्क मार्गे शहरात प्रवेश. फॅक्टरी आणि बॉयलर डिपार्टमेंट मार्गे शहरात परत. सांत इनेज सर्कल- ताज विवांता आणि कला अकादमी आणि दिवजा सर्कल मार्गे बस स्टँड असा असेल.

पाचवा मार्ग पुन्हा पणजीच्या सीसीपी मार्केटमधून उगम पावतो आणि काकुलो मॉल, मधुबन अपार्टमेंट, भाटले, सांत क्रूझ चर्च, जीएमसी आणि कुजिरा मार्गे असेल.

सहावा मार्ग पुन्हा पणजी बस-स्टँड नेवगीनगर भाटले, टीबी हॉस्पिटल सांत इनेज (ताज विवांता) सर्कल, पणजी सीसीपी मार्केट आणि डीबी मार्गाने बस स्टँडकडे परत.

सातवा मार्ग बस-स्टँड ते नेवगीनगरकडे पुढे भाटले, शंकर देवस्थान, ताळगाव, सांत क्रुझ येथील टीबी हॉस्पिटलकडे जातो आणि चार खांब, मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूल आणि पाटो सर्कल मार्गे पणजी बस-स्टँडकडे परत असा असेल.

दरम्यान, क्यूआर कोड तिकीट आणि मोबाईलवर डिजिटल तिकिटांची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!