पणजी :
‘अबकी बार, परिवार काबार’. समाज माध्यमांवरुन परिवार निर्माण होऊ शकत नाही. नातेसंबंध निर्माण आणि विकसित करण्यासाठी द्वेष नव्हे तर प्रेम आणि आपुलकीचा प्रसार करणे आवश्यक आहे. मोदी की गॅरंटीनंतर आता मोदी का परिवार कोसळला, असा टोला काँग्रेस माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरुन “मोदी का परिवार” वाक्य काढून टाकण्याच्या त्यांच्या अनुयायांना केलेल्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना अमरनाथ पणजीकर यांनी “रंगभूषा जास्त काळ टिकत नाही” असा टोमणा मारला.
https://x.com/AmarnathAldona/status/1800561154793894274?t=KicpEGRJVVpRe3Q4SzIS_A&s=19
ज्यांना त्यांनी एकेकाळी “परिवार” म्हटले होते, त्या देशातील सर्व नागरिकांना ते न्याय देऊ शकणार नाही, याची नरेन्द्र मोदींना पूर्ण जाणीव आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपला परिवारवादी अजेंडा पूढे नेण्यात येणारे लक्षात घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता “मोदी का परिवार” पासून दूर जाण्याचे ठरविले आहे. यातून भाजपचे ‘वापरा व फेका’ धोरणही समोर येते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘फेक मॅन ऑफ इंडिया’ म्हणून इतिहासात राहतील. त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच फक्त खोटारडेपणा केला आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
नरेंद्र मोदींनी चालू केलेल्या सर्व घोषणा व ब्रिदवाक्ये नाहीशा झाल्या आहेत. लोकांच्या भावनांशी खेळण्याची कला अंगी बाणवणारे नरेंद्र मोदी एक संधीसाधूच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा पूर्णपणे सपाटा होणे काळाची गरज आहे. भाजप कपटी व कारस्थानी आहे हे लोकांना कळून चुकले आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.