Big Bull राकेश झुनझुनवाला यांचे निधन
मुंबई:
शेअर मार्केटमधील बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अवघ्या 5,000 ते 40,000 कोटी रुपयांचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज वयाच्या 62 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. अहवालानुसार, तब्येतीच्या समस्यांमुळं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांनी सकाळी 6.45 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण व्यापारी जगतात शोककळा पसरलीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. “राकेश झुनझुनवाला एक अदम्य व्यक्तीमत्त्व होते. जगाच्या अर्थकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. ते भारताच्या प्रगतीसाठी खूप उत्साही होते. त्यांचे असे जाणे दुर्दैवी आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.