
साताऱ्यात वन्यजीवचा निधी ठेकेदाराच्या आणि स्थानिक नेत्यांच्या घशात कोणी घातला…?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील जावली तालुक्यातील वन्यजीव विभागामार्फत बफर झोन परिसरातील गावांमध्ये विकास कामांसाठी आलेला निधी इतरत्र वळवून ज्या ठिकाणी काम करणं गरजेचं असताना परवानगी नसताना बेकायदेशीर रितीने कोट्यवधी रुपयांचा निधी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून या सर्व प्रकारांमध्ये स्थानिक नेत्यांसह अधिकारी ठेकेदार यांनी संगनमताने केलं असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
खरंतर जावली तालुका हा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदारसंघात येत असून , बामणोली परिसरात वनमजुरांसाठी बांधण्यात आलेल्या घराच्या इमारतीच्या बांधकामांचा दर्जा पाहता दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींचे डफले पडलें असून दयनीय अवस्था पहायला मिळतेय . यामुळे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आता स्वतः लक्ष घालावं अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

खरंतर बफर झोन परिसरातील सोई सुविधेसाठी आलेला निधी अन्यत्र कसा व कोणाच्या शिफारसी ने वळवला, त्यासाठी कोणी परवानगी दिली यासंदर्भात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळपास एक नव्हे चार वेळा फोन द्वारे व प्रत्यक्ष विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली.
नेमकं काय प्रकरण आहे यासंदर्भात आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी घेतलेला हा खास आढावा…