राजकीय पक्षाच्या मेळाव्यात बॉम्बस्फोट; प्रमुख नेत्यासह २० ठार, ५० जखमी…
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात देशाला हादरवणारी घटना घडली आहे. येथील खार तालुक्यात एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात बॉम्बस्फोट घडवला आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह २० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात हा बॉम्बस्फोट घडला. बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी मृतांची आणि जखमींच्या संख्येची पुष्टी केली आहे.