अनन्या ‘का’ म्हणतेय ‘कॉल मी बे’?
‘प्राइम बे’ आणि प्राइम व्हिडिओच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वरुण धवन, स्ट्रीमिंग सेवेची आगामी सिरीज, ‘कॉल मी बे’चा एक अपडेट घेऊन आला आहे. वरुणद्वारा केलेल्या एका मजेशीर व्हिडिओमध्ये, त्याने आगामी अमेझॉन ओरिजनल स्क्रिप्टेड सिरीज ‘कॉल मी बे’मधील अनन्या पांडेची ‘बे’ म्हणून ओळख करून दिली आहे. या व्हिडिओमध्ये, अनन्याला तिच्यातील फॅशनिस्टाला आव्हान देताना तसेच वरुण धवनला फॅशन आणि कपड्यांबद्दल शिकवताना पाहायला मिळेल. अशातच, दोघेही आपल्या अमेझॉन सिरीजची घोषणा करत आहेत, ज्याचे शूटिंग नुकतेच सुरू झाले आहे.
अरबपति फॅशनिस्टा ‘बे’ (अनन्या पांडेद्वारा अभिनीत)ला तिच्या अतिश्रीमंत कुटुंबाने सेलसियस घोटाळ्यामुळे नाकारले आहे. पहिल्यांदाच तिला स्वतःचा बचाव करायचा आहे. या प्रवासात, ती स्टिरियोटाइपवर मात करते, पूर्वधारणा तोडते आणि आपण खरोखर कोण आहोत याचा शोध घेते.
धर्माटिक एंटरटेनमेंट प्रोडक्शनची ‘कॉल मी बे’ही सिरीज करण जोहर, अपूर्व मेहता तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सोमेन मिश्रा द्वारा निर्मित आणि कॉलिन डी’कुन्हाद्वारा दिग्दर्शित आहे. दरम्यान, इशिता मोईत्राद्वारा क्रिएटेड, ज्यांनी समीना मोटलेकर आणि रोहित नायर यांच्यासह सिरीजचे सह-लेखन देखील केले आहे. अशातच, ‘कॉल मी बे’ आपल्या रिलीज नंतर 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.
https://www.youtube.com/watch?v=1N1WhZ4HMeg