‘स्वराज्यरक्षक हा अजितदादांचा शब्द बरोबर, परंतू…’
कराड (अभयकुमार देशमुख) :
स्वराज्यरक्षक हा अजित दादांचा शब्द बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर छ. संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारकही होते, आणि ते कडवे हिदु धर्मवीर होते. अजित दादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले. तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. तेवढा अजित दादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापु पाटील यांनी लगावला आहे.
कराड येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहाजीबापु पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमात बोलताना छ. संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या शब्दावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यावरून शहाजीबापु यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
शिंदे- फडणवीस सरकारची धोरणे ही लोकहिताची आहेत. या धोरणात वीज कर्मचाऱ्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीचं धोरण आखलेलं आहे. जे धोरण सरकारने स्विकालेलं आहे, ते महाराष्ट्र राज्याच्या फायद्याच आहे.