google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जगमहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचा भाजपकडून अपमान; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा


पणजी :

भाजपने ‘हिंदुत्व’ आणि ‘महान नेत्यांच्या नावांचा’ केवळ राजकीय सोयीसाठी वापर केल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. भाजपला हिंदुत्वाचा, भारतातील महान नेत्यांचा आदर नाही आणि भाजपची तथाकथित देशभक्ती खोटी आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या वक्तव्यावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपतींचा वारसा आता जुना झाला आहे असे वक्तव्य करून छत्रपतींची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी करण्याचा प्रयत्न केला तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाला पाच माफीनामा पत्रे लिहिल्याचे केलेले वक्तव्य यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी घृणास्पद अशा दोन्ही विधानांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते यांनी केलेल्या घृणास्पद वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी माझी मागणी आहे. छत्रपतींचा अवमान करणाऱ्या वक्तंव्यावर मुख्यमंत्री गप्प का? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आज संध्याकाळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी आहे. मला आशा आहे की ते शहाणपणाने वागतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांकडून होणारी पुढिल कारवाई टाळतील, असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला.


महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपतींना “जुन्या काळातले” म्हणून संबोधले हे खेदजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सदैव चालू राहील हे त्यांनी जाणले पाहिजे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ‘माफीनामा फेम’ विनायक सावरकर यांच्या बचावासाठी छत्रपतींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करून भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड केला. कोश्यारी आणि त्रिवेदी यांनी आपल्या बेजबाबदार वक्तव्याने आपलेच हसे करुन घेतले आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.


मी पुन्हा एकदा गोव्यातील जनतेला भाजपचा छुपा अजेंडा समजून घेण्याचे आवाहन करतो. भाजपला भारतातील महान नेत्यांबद्दल आदर नाही. त्यांचा एकमेव अजेंडा म्हणजे “धर्म”, “देशभक्ती”, “महान नेते” यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करणे आणि अखेरीस तिघांनाही सोयिस्करपणे डावलणे, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!