शिवसेना फोडण्यासाठी ठाण्याचा नगरसेवक साताऱ्यात…
सातारा (महेश पवार):
महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे खरी शिवसेना आमची की तुमची , कोण कोणासोबत आहे हे दाखवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत , अनेक माझी आमदार , नगरसेवक , जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी यांना शिंदे गटात येतानाचे चित्र दिसते तर मूळ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक जैसे थे परिस्थिती मध्ये उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचे सांगितले जाते.
परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम पिच असलेल्या सातारा शहरातील मूळ शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांना शिंदे गटाकडे वळवण्यासाठी ठाण्यातील एक नगरसेवक सातार्यात ठाण मांडून बसला असून शिंदे गटाकडे वळवण्यासाठी वेगवेगळी आमिष दाखवलं जातं असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सातारा शहरातील मूळ शिवसेना फूटणार की अमिषाला बळी पडणार हे येणा-या काळात समोर येईल.
सातार्यातील शिवसेना पदाधिकारी यांना ठाण्यातून आलेल्या नगरसेवकांकडून आलेल्या ऑफर मुळं मुळ शिवसैनिक कोड्यात पडलें असून , शिवसेनेतील गट एकत्र येत बैठका घेत जायचं का नाही हे ठरवण्यासाठी आले पण तेच संभ्रम अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.