
२३ एप्रिल रोजी केळशी येथे गोळीबार प्रशिक्षण
दाबोळी येथील आयएनएस हंसाने २३ एप्रिल २०२५ रोजी केळशी रेंज येथे लहान शस्त्रांचा (firing) गोळीबार प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती दिली आहे.
गोळीबार रेंज आसपासच्या लोकाना आणि मालमत्तेला कोणताही धोका नाही. रहिवाशांना गोळीबाराच्या आवाजाने न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, केळशी हे धोक्याच्या क्षेत्रात येत असल्याने रहिवाशांना त्याच्या शेजारील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मनाई आहे. केळशी रेंजच्या २ किमी अंतरावर समुद्रात मासेमारी, नौका मनोरंजन नौकानाही प्रतिबंध आहे. त्यासाठी नागरिकांनी आणि नाविकांनी वरील काळात धोक्याच्या ठिकाणी प्रवेश करू नये असे आयएनएस हंसाच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी कळविले आहे.