रविवार ठरला गौरी गणपतीच्या खरेदीसाठीचा..
सातारा :
येत्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या आनंदोत्सवाला अर्थात लाडक्या विघ्नहर्ता गणरायाच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे .त्यासाठी आजचा रविवारचा दिवस सातारकरांनी खरेदीसाठी घालवला .मोठ्या धामधुमीत सकाळपासूनच सातारा शहरातील राजवाडा मोती चौक ,सदाशिव पेठ, खणआळी, 501 पाटी परिसरामध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
बुधवारी स्थापन होणाऱ्या गणेश मूर्ती नंतर शनिवारपासून घरोघरी ज्येष्ठ व कनिष्ठा गौरींचे आगमन होत आहे. या गौरीच्या सणासाठी लागणारी विविध पूजा साहित्य ,तसेच सजावटीचे साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आकर्षक मखर, तोरणे, माळा ,फ्लावर पॉट त्याचबरोबर पूजा साहित्यातील उदबत्ती ,कापूर ,अष्टगंध, गुलाल, बुक्का, माळा , धूप साठी पूजा साहित्य भांडारही फुलून गेली होती परप्रांतीय विक्रेत्यांनी विक्रीस आणलेली शोभेची प्लॅस्टिक व आगळ्यावेगळ्या प्रकारची रंगीत फुले त्यांचे गुच्छ खरेदीसाठी ही गर्दी दिसून येत होती.
गौरीच्या करिता लागणारे विविध प्रकारचे सोन्याचे/ चांदीचे दिसणारे दागिने त्याचबरोबर मोरपिसे ,फुलांची तोरणे यांचे स्टॉल रस्त्यावर दिसून येत होते. शहरातील वाहतूक शाखेच्या वतीने यासाठी या रस्त्यातून एकेरी वाहतूकही काही काळ बंद केली होती. त्यातच विविध गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे गेले दोन दिवसापासून मंडपात आगमन होत असल्यामुळे अधून मधून ढोल ताशांच्या गजरात या गणेश मूर्ती ही वाजत गाजत आणल्या जाताना भाविकांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.
बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी तसेच त्याला जोडून येणाऱ्या ज्येष्ठ कनिष्ठ गौरीच्या पूजनासाठी सातारकरांनी आजचा रविवार अक्षरशा खरेदीत घालवला सकाळपासूनच सातारा शहरातील राजवाडा मोती चौक ,सदाशिव पेठ, खणआळी, 501 पाटी या परिसरामध्ये विविध विक्रेत्यांनी गर्दी केली होती . गौरीच्या साठीचे दागिने ,मोरपिसे पूजेच्या तसेच सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी सातारकर यांची प्रचंड गर्दी झाली होती. विशेष स्टॉलवर ही खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली दिसून येत होती.
सदाशिव पेठेतील पंचमुखी गणेश मंडळाचे वतीने रस्त्यातच मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झालेली दिसून येत होती .मात्र वाहतुकीसाठी हा मंडप अडथळा ठरू नये अशीच मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.