गोवा
Goa Liberation : ‘गोवामुक्तीने उघडली लोकांसाठी शिक्षणाची दारे’
मडगाव :
गोव्याच्या मुक्तीमुळे (goa liberation) वसाहतवाद आणि सरंजामशाहीने दबलेल्या जनतेसाठी समान संधी आणि समान व्यासपीठ प्राप्त झाले. डॉ. भाऊसाहेब बांदोडकरांच्या रूपाने लाभलेल्या गोव्याच्या पहिल्या दृष्ट्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेल्या सार्वजनिक शैक्षणिक धोरणाने राज्याच्या दर्जेदार मानवी विकासात मोठे योगदान दिले आहे.
भाऊसाहेबांचा हा शैक्षणिक वारसा आपल्या पिढीने पुढे नेला पाहिले आणि सार्वजनिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात वास्तुविशारद अदिती कोरगावकर यांनी केले. गोवा मुक्तिदिनानिमित्त (goa liberation) गोगोळ येथील शासकीय शाळा येथे आयोजित ध्वजारोहण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी मुक्तिदिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना स्टेशनरी वस्तूंचे वाटप करण्यात आले.