गोव्याने नागरिकांच्या सुविधेसाठी घरोघरी वितरण सेवा शुल्क केले कमी
गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभागाने (DITE&C) अलीकडेच सरकारी सेवा अधिक सुलभ आणि परवडण्याजोग्या बनवण्यासाठी ग्रामीण मित्र उपक्रमातील प्रमुख घडामोडींची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या, “ग्रामीण मित्राची पुनर्रचना- सरकारी सेवांचे घरोघरी वितरण” या उपक्रमात घरोघरी सेवांचा अधिकाधिक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित सेवा वितरण शुल्क लागू केले आहे.
सुधारित आराखड्यांतर्गत नागरिकांना एकूण रु. 250 सेवा शुल्क पैकी रु. 50 प्रति सेवा वितरण शुल्क द्यायचे आहे. सरकार उर्वरित रु. 200+ कर सबसिडी देणार आहे. याचा उद्देश ग्रामीण मित्र सेवांमध्ये सुलभता वाढवणे, नागरिकांच्या पसंतीनुसार संरेखित करणे आणि अधिक सेवेच्या वापरास प्रोत्साहन देणे आहे.
सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि.च्या अभिप्रायासह डिसेंबर 2023 पर्यंतच्या गेल्या पाच महिन्यांतील विश्लेषणामध्ये, मागील शुल्क रचनेबद्दल नागरिकांची अनास्था दिसून आली. खर्चाच्या चिंतेमुळे, नागरिकांनी जवळच्या सामान्य सेवा केंद्र – ग्रामस्तरीय उद्योजक केंद्रांना भेट देणे पसंत केले, ज्यामुळे ग्रामीण मित्र योजनेचा वापर कमी झाला. घरोघरी सेवा वितरणासाठी विविध राज्य प्रारूपांची सखोल तपासणी आणि तुलना केल्यानंतर, राज्य सरकारने लागू करांसह 250 रुपये सेवा वितरण शुल्क प्रस्तावित केले आहे.
सेवा प्रवेश अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभाग (DITE&C) ने कार्यक्षम सेवा वितरण सुलभ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान साधनांचा लाभ घेत 11 इकोसिस्टमची स्थापना केली आहे. ही इकोसिस्टम विविध प्रकारच्या सरकारी सेवांमध्ये एक खिडकी प्रवेश प्रदान करतील.
नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या सोयीस्कर, त्रास-मुक्त, परवडणारे, वेळेचे बंधन आणि पारदर्शक अनुभव सुनिश्चित करतील. या व्यतिरिक्त, सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड ने 14471 या टोल-फ्री क्रमांकासह एक कॉल सेंटर सुरू केले आहे, जे नागरिकांना सरकारी सेवा आणि समर्थनासाठी सुलभ प्रवेश प्रदान करते.
सुधारित ग्रामीण मित्र सेवा उपक्रम सुलभ आणि किफायतशीर उपायांद्वारे नागरिक-केंद्रित सेवा वितरण वाढविण्याची गोव्याची कटीबद्धता दर्शवितो, सर्वसमावेशक प्रशासन आणि सार्वजनिक सेवा उत्कृष्टतेसाठी त्याची दृष्टी अधिक मजबूत करते.