
‘या’ सिनेमांनी उठवली गोवा राज्य चित्रपट महोत्सवावर आपली विजयी मोहोर
कला अकादमीत रविवारी सायंकाळी झालेल्या १०, ११ आणि १२ व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा आमदार दिलायला लोबो आणि मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात दहावा, अकरावा आणि बारावा असे चित्रपट महोत्सवांचा समावेश होता. त्यामुळे दहाव्या (१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान निर्मिती झालेले) महोत्सवात ‘जुझे’ चित्रपटाने बाजी मारली.
विशेष ज्युरी पुरस्कार : उत्कृष्ट दिग्दर्शन नितीन भास्कर (काजरो), उत्कृष्ट कलाकार विठ्ठल काळे (काजरो), उत्कृष्ट अभिनेत्री बरखा नाईक (जुझे), उत्कृष्ट सहायक अभिनेत्री गौरी कामत (कॉस्तांव दी कुपुसांव), उत्कृष्ट कला दिग्दर्शक रितेश राजन-श्रीधर चोगालिंगम, उत्कृष्ट पार्श्वगायक चिन्मय श्रीपाद (आमीजादे), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी अभिराज रावाळे (जुझे) व एस. समीर (काजरो), उत्कृष्ट एडीटर सुझाना पेद्रो, (जुझे), उत्कृष्ट ऑडियोग्राफी थॉमस रॉबर्ट (जुझे), उत्कृष्ट कला दिग्दर्शक प्रणिता पळ-रवी शाह (जुझे), उत्कृष्ट वेशभूषा निलंचल घोष (जुझे).
अकराव्या महोत्सवातील विजेते : उत्कृष्ट चित्रपट रानसावट, उत्कृष्ट दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर, उत्कृष्ट कलाकार विशाल गावस (रानसावट), उत्कृष्ट अभिनेत्री सुमन फर्नांडिस (पेद्रू पदेर), उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री मीना घोष (डिकॉस्टा हाऊस), उत्कृष्ट कथा गुरुदास नाटेकर (रानसावट), उत्कृष्ट स्क्रिनप्ले जितेंद्र सिकेरकर (डिकॉस्टा हाऊस),
उत्कृष्ट संवाद जोसेफ फ्रान्सिस डिसोझा व ख्रिस्ट संजो सिल्वा (पेद्रू पदेर), उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन व उत्कृष्ट गायक एलिक वाझ (पेद्रू पदेर), उत्कृष्ट पार्श्वगायिका अक्षदा तळावलीकर (रानसावट), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी पॅटसन बार्बोझा (डिकॉस्टा हाऊस), उत्कृष्ट एडिटर सपना नाईक (पेद्रू पदेर), उत्कृष्ट ऑटोबायग्राफी रोहित गवंडी (रानसावट), उत्कृष्ट कला दिग्दर्शनक अंकिता डिसोझा (पेद्रू पदेर), उत्कृष्ट वेशभूषा रश्मी हळदणकर (रानसावट). विशेष ज्युरी पुरस्कार : उत्कृष्ट गीते एलिक वाझ (पेद्रू पदेर), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी अश्विन चिदे, उत्कृष्ट ऑडियोग्राफी भावेश फुलारी आणि उत्कृष्ट एडिटिंग गोपाल सॉलटेक (कुपामचो दरयो). नॉन फिचर फिल्म : उत्कृष्ट चित्रपट कुपामचो दरयो, उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन दौलत पालयेकर व उत्कृष्ट थिम (कुपामचो दरयो).
बाराव्या महोत्सवातील विजेते : उत्कृष्ट चित्रपट प्रथम मोग, दुसरे पारितोषिक क्रेझी मोगी, उत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्ट सिल्वा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट अभिनेता अनिकेत मडकईकर, उत्कृष्ट अभिनेत्री समांता दा कॉस्ता, उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता जॉन डिसिल्वा, उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री शेफाली नाईक, उत्कृष्ट कथा ख्रिस्ट सिल्वा, उत्कृष्ट संवाद व उत्कृष्ट स्क्रिनप्ले ख्रिस्ट सिल्वा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट गीते व उत्कृष्ट कला दिग्दर्शन एलिसन गोन्साल्विस (क्रेझी मोगी), उत्कृष्ट पार्श्वगायक राजेश मडगावकर (मोग), उत्कृष्ट पार्श्वगायिका
सोनिया सिरसाट (मोग), उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी जोसफर्न डिसोझा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट एडिटर ख्रिस्ट सिल्वा (क्रेझी मोगी), उत्कृष्ट ऑडियोग्राफी तरन डिसोझा (मोग), उत्कृष्ट कलादिग्दर्शक जोसेफ वर्गीस-जेसन फर्नांडिस (क्रेझी मोगी), उत्कृष्ट वेशभूषा अलिशा साळकर (फटिंग नं. १), विशेष ज्युरी पुरस्कार : उत्कृष्ट दिग्दर्शक नीलेश माळकर (मोग), उत्कृष्ट अभिनेता मनोज जोशी (मोग), उत्कृष्ट अभिनेत्री नश्रत्रा मेढेकर (मोग), उत्कृष्ट कला दिग्दर्शन डॅनिस वल्लभन (मोग).