
‘परिक्रमा’चा १४ डिसेंबर रोजी विशेष ‘पूर्वतयारी उपक्रम’
परिक्रमा नॉलेज टर्मिनसच्यावतीने शनिवार, 14 डिसेंबर 2024 रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे झिरो फेस्टसाठी ‘पूर्वतयारी उपक्रमाचे’ आयोजन करण्यात आले आहे. झिरो फेस्टमधील सहभागींना त्यांच्या स्पर्धांची तयारी करण्यास मदत करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे, परिक्रमाच्या कार्यक्रम अधिकारी मेघा रिवणकर यांनी सांगितले.
सदर उपक्रमाची सुरुवात सकाळी 10:00 वाजता सुरू होणार असून, यात विविध परफॉर्मिंग आर्ट्स, शैक्षणिक आणि व्हिज्युअल आर्ट्स तज्ञ सहभागींना मार्गदर्शन करतील. यात प्रामुख्याने शुभंकर खांडेपारकर, मंदार जोग, क्षितीजा गावकर, युगांक नायक, रोहित खांडेकर, सिंधुराज कामत, उर्वशी नायक, हेरंब नायक, प्राची नायक हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

परिक्रमा नॉलेज टर्मिनसने नुकताच सहभागींसाठी ‘परिक्रमा फंड’ सुरू केला आहे. याबाबतचा अधिक तपशीलदेखील या पूर्वतयारी उपक्रमात घोषित केला जाईल. सदर उपक्रम सर्व सहभागी उच्च शिक्षण संस्था आणि गैर-शैक्षणिक संस्थांसाठी खुला असून, सहभागी संस्था जास्तीत जास्त 5 प्रतिनिधी पाठवू शकतात, असेही मेघा यांनी नमूद केले आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी knowledgeterminus@gmail.com वर नोंदणी करता येईल. रवींद्र भवन मडगाव आणि कला आणि संस्कृती विभाग, गोवा सरकार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.