google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
Homeसिनेनामा 

‘चित्रपटांमध्ये सार्वत्रिक वैश्विकता हा घटक असायलाच हवा’

“डिजिटल मीडियाच्या उदयामुळे  तंत्रज्ञान सुगम्यता वाढली आहे, ज्यामुळे अनेकजण  चित्रपट निर्मितीमध्ये येत आहेत.  तंत्रज्ञान हा मुख्य घटक असला तरी, सौंदर्यशास्त्र, बुद्धीमत्ता, कौशल्ये, मूल्ये आणि परिपूर्णता या कलेचे महत्त्वपूर्ण घटक कायम असतील,” असे इंडियन पॅनोरमा नॉन-फीचर फिल्म्स ज्युरीचे अध्यक्ष अरविंद सिन्हा म्हणाले.

इंडियन पॅनोरमा नॉन-फीचर फिल्म्सच्या अरविंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय ज्युरींनी आज पत्रकार परिषदेत इफ्फी 54 च्या नॉन फीचर फिल्म्स विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल आपले मत व्यक्त केले.

ज्युरी अध्यक्ष म्हणाले की पूर्वीच्या तुलनेत आजकाल काल्पनाधिष्ठीत चित्रपटांवर अधिक भर आणि लक्ष दिले जात आहे आणि माहितीपट बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. डिजिटल माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे चित्रपट निर्मितीची सुगम्यता वाढल्यामुळे हा बदल झाला असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्ष म्हणाले की माहितीपटांच्या निर्मितीसाठी निधीची कमतरता आहे आणि आजकाल त्यासाठी स्वतःच निधी पुरवला जातो . माहितीपटांचा दर्जा खालावल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि आपण वास्तविकतेचे दर्शन घडवणारे उत्तम काम प्रेक्षकांसमोर आणायची गरज आहे . चांगल्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी परिश्रम, मेहनत, कौशल्य आणि सिनेमॅटिक मूल्ये आवश्यक आहेत असे ते म्हणाले.

“कालबाह्य शैली टाळून आणि तरुण पिढीला अनुरूप माहिती, सामुग्री यावर लक्ष केंद्रित करून माहितीपट पुनरुज्जीवित करण्‍याची आवश्‍यकता आहे. ‘चेर्नोबिलच्या यशामुळे  आकर्षक कथनशैली गरजेची आहे,  हे अधोरेखित झाले आहे. तरुणांमध्ये डॉक्युमेंटरी म्हणजेच माहितीपट या प्रकाराची आवड निर्माण झाली आहे,’ असे ज्युरींपैकी  एक सदस्या पौशाली गांगुली यांनी ठळकपणे नमूद केले.

अखेरीस चित्रपटाचे आशय मूल्य विरुद्ध चित्रपटाची लोकप्रियता किंवा  तो किती लोकांपर्यंत पोहोचतो,  यावरील वादविवादाबद्दल बोलताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की,  चित्रपटाला मूलत: ‘सिनेमॅटिक’ मूल्य असणे आवश्यक आहे. “चित्रपटामध्‍ये वैश्विकतेला सामावण्‍याची क्षमता म्हणजेच हा  एक घटक असलाच पाहिजे. त्यामुळेच तर वैश्विकता असलेला सिनेमा  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व  प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. चित्रपटामध्‍ये असलेला  सार्वत्रिकतेचा घटकच  वंश, पंथ आणि विविधतेच्या पल्याड जावून  केवळ मानवतेला स्पर्श करतो, ” असेही  ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी महान भारतीय  चित्रपट निर्माते –दिग्दर्शक  सत्यजित रे आणि अदूर गोपालकृष्णन यांचाही उल्लेख केला. या चित्रकर्त्यांच्या  चित्रपटांमध्ये सार्वत्रिकतेचे मूल्य होते आणि त्यामुळे त्यांच्या कलाकृतींनी  जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!