अर्थमत/ टेक्नॉलॉजी

मोलबायो डायग्नोस्टिक्सची अपंग मुलांसाठी गोव्यात थेरपी युनिट्स

जागतिक आरोग्य देखभाल क्षेत्रातील एक इनोवेटर, मोलबायो डायग्नोस्टिक्स या गोव्यातील कंपनीने आपल्या ट्रूनॅट या रिअल-टाइम पीसीआर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य देखभाल सेवांची उपलब्धता अजून जास्त वाढवली आहे. ट्रूनॅटला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. आजाराचे निदान अर्थात डायग्नोस्टिक्सपुरते मर्यादित न राहता, मोलबायोने आरोग्य देखभाल सेवा सर्वांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपल्या सर्वात नवीन सीएसआर उपक्रमामार्फत आपली सुरुवात जिथे झाली त्या गोवा राज्यात सार्थक सामाजिक प्रभाव निर्माण करणे सुरु ठेवले आहे. आस्थाज सेंटर ऑफ एक्सेलेन्ससोबत हातमिळवणी करून, या कंपनीने एक विशेष ऑक्युपेशनल थेरपी युनिट तसेच एक ऑडिओलॉजी युनिट स्थापन करण्यात मदत केली आहे, अपंग मुलांच्या विकास व थेरपीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी ही युनिट्स डिझाईन करण्यात आली आहेत.

ही दोन्ही नवीन युनिट्स आरोग्य देखभाल सेवांमधील व्यवस्थात्मक कमतरता भरून काढणे, वंचित समुदायांना दर्जेदार सेवा उपलब्ध व्हाव्यात हे मोलबायोचे व्यापक मिशन आहे. त्यामुळे आस्थामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या १०० पेक्षा जास्त मुलांना आणि इतर अनेक मुलांना त्यांच्या अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरमार्फत प्रोफेशनल असेसमेंट, रुटीन थेरपी आणि विकासामध्ये साहाय्य मिळू शकेल.

मोलबायो डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या डायरेक्टर – ऑपरेशन्स, संगीता श्रीराम म्हणाल्या, मोलबायोमध्ये आम्ही असे मानतो की, आरोग्य देखभाल सेवांपर्यंतची पोहोच ही संधीपर्यंत पोहोच उपलब्ध करवून देण्यापासून सुरु होते. खासकरून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी हे महत्त्वाचे ठरते. आस्थासोबत आमची भागीदारी सर्वसमावेशक वृद्धी आणि विकासाप्रती आमची चिरस्थायी वचनबद्धता दर्शवते, प्रत्येक मुलामुलीला, त्याच्या-तिच्या क्षमता कितीही असो, उत्कर्ष साधण्याची संधी, साधने मिळाली पाहिजेत. ही थेरपी युनिट्स म्हणजे फक्त पायाभूत सोयीसुविधा नाही तर आत्मसन्मान, स्वातंत्र्य दीर्घकालीन सक्षमता यांच्याकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत.”

 ऑक्युपेशनल थेरपी युनिट या मुलांना अत्यावश्यक मोटर, सेन्सरी आणि दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात मदत करेल, तर ऑडिओलॉजी युनिट निदान न करण्यात आलेल्या श्रवण समस्या दूर करेल, अशा समस्यांमुळे बोलणे, संवाद साधणे व शिकण्यामध्ये अनेक अडचणी येतात. ही युनिट्स एक सर्वसमावेशक साहाय्य व्यवस्था निर्माण करतात, प्रत्येक मुलाला त्याच्या-तिच्या सर्व क्षमतांचा वापर करता यावा हा यामागचा उद्देश आहे. या युनिट्सचा उदघाटन समारंभ गोव्यातील आस्थाज सेंटरमध्ये आयोजित करण्यात येईल, यावेळी स्थानिक मान्यवर, आरोग्य तज्ञ व समाजातील हितधारक उपस्थित राहतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!