
‘भारत–इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे ‘मेक इन इंडिया’च्या नव्या युगाची सुरुवात’
नवी दिल्ली / लंडन :
टीव्हीएस मोटर कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय अधिकृत ब्रिटन दौऱ्यात भारत- इंग्लंड मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाल्याच्या घटनेचे स्वागत केले आहे. या ऐतिहासिक करारामुळे 2030 पर्यंत या दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार 60 अब्ज अमेरिकी डॉलर वरून 120 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. ‘विकसित भारत’ या पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या मुक्त व्यापार करारामुळे विशेषतः भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत भारतीय उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रासाठी जागतिक स्तरावर नवीन क्षितिजे खुली होणार आहेत. टीव्हीएस मोटर कंपनीसाठी, हा करार अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाला आहे. कंपनीने अलीकडेच प्रतिष्ठित ब्रिटीश ब्रँड नॉर्टन मोटरसायकल्सचे धोरणात्मक अधिग्रहण केल्यानंतर यूकेमध्ये नवीन नॉर्टन मोटरसायकल्सची श्रेणी सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
या मुक्त व्यापार कराराचं स्वागत करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुदर्शन वेणु म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘विकसित भारत’ हा दृष्टिकोन आणि भारताला जागतिक उत्पादन व डिझाईन क्षेत्रातील महासत्ता बनवण्याची त्यांची निःसंदिग्ध समर्पित भावना आमच्यासाठी आत्यंतिक प्रेरणादायी आहे. भारत-यूके मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणे हा एक निर्णायक क्षण आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना ‘मेक इन इंडिया’ चा जगभर प्रसार करण्याचे नवीन क्षितिज खुले होत आहे. यावर्षी सादर होणाऱ्या नवीन नॉर्टन वाहनांना भारत-यूके यांच्यातील व्यापार संबंध अधिक मजबूत झाल्याचा थेट लाभ होणार असल्यामुळे आम्हाला विशेष आनंद झाला आहे. या करारामुळे आमच्या जागतिक महत्त्वाकांक्षांना नवीन ऊर्जा मिळाली असून जागतिक दर्जाची उत्पादने आणि ब्रँड्स निर्माण करण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ होत आहे.”
भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे भारतीय कंपन्यांना त्यांचा जागतिक पातळीवरील ठसा विस्तारता येईल, तसेच भारतातील नाविन्यपूर्णता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल असा विश्वास टीव्हीएस मोटरला आहे.
भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे भारतीय कंपन्यांना त्यांचा जागतिक पातळीवरील ठसा विस्तारता येईल, तसेच भारतातील नाविन्यपूर्णता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रदर्शन मोठ्या व्यासपीठावर करता येईल असा विश्वास टीव्हीएस मोटरला आहे.