पुष्पा २ मध्ये अलू अर्जुनचा नवा लूक?
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 च्या मुहूर्ताच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले होते. आता, सुपरस्टार त्याच्या चित्रीकरणाला कधी सुरूवात करणार हे जाणण्यासाठी नेटिझन्स उत्सुक होते. प्रेक्षकांमध्ये त्याची इतकी क्रेझ आहे की सोशल मीडियावर अनेक गाणी, सीन्स आणि त्याचे मोनोलॉग्स ट्रेंड होऊ लागले. संपूर्ण वातावरण ‘पुष्पा’मय झाले असून मुलांमध्ये चित्रपटाच्या सामी सामी आणि श्रीवल्लीवर नृत्य करण्याची अहमहमिका सुरु आहे तर प्रौढांनी अल्लूच्या चालण्याची स्टाईल आणि शैली जशी च्या तशी स्वीकारली. एकूणच पुष्पाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना, त्याच्या सिक्वेलची धमाकेदार घोषणा होणे, ही त्याच्या चाहत्यांसाठी अत्यानंदाची गोष्ट होती.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुन लवकरच पुष्पा २ च्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. “साधारण ऑक्टोबरच्या मध्यापासून अल्लू अर्जुन “पुष्पा २” च्या चित्रीकरणास सुरुवात करेल आणि लवकरच त्याचा नवा लुक दर्शकांसमोर येईल. “पुष्पा” स्टार ह्यासाठी प्रचंड मेहनत घेत असून “पुष्पा २” ची तयारी जोरात सुरु आहे. सूत्रांच्या म्हणण्यातील खरे खोटे माहित नसले तरी माहित अल्लू अर्जुनच्या “पुष्पा 2” च्या चित्रीकरणाची सुरुवात ही बातमी देशभरात एखाद्या सणासारखी साजरी होईल. त्याचा नवा लूक एका नव्या अंदाजात सादर होणार असून देशवासी ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पहात असतील, यात शंका नाही.
आज अल्लू अर्जुन ग्लोबल आयकॉन आहे. या पॅन इंडिया स्टारने जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून निवड झाली असून अभिनेत्याने भारताची ध्वजा वैश्विक पातळीवर उंचावली आहे. त्या दिवशी इंटरनेटवर अल्लू अर्जुनचा बोलबाला होता आणि तो सर्वत्र ट्रेंड करत होता. त्याच्या चाहत्यांमध्ये अल्लू अर्जुनची जबरदस्त क्रेझ असून या गणेशोत्सवाच्या काळात त्याच्या “पुष्पा” पात्राने सर्व गणेश मंडळांवर अधिराज्य गाजवले होते. येत्या काळात “पुष्पा 2” मधून अल्लू अर्जुन आणखी काय घेऊन येणार आहे हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.