‘सपने वर्सेस एव्हरीवन’ जगातील सर्वाधिक लोकप्रिय २५० मालिकांच्या यादीत
पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी आणि पिचर्स या मालिकांनंतर, आता ‘सपने वर्सेस एव्हरीवन’ ही मालिका, जागतिक स्तरावरील ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या यादीत समाविष्ट होणारी सातवी ‘टीव्हीएफ’ मालिका ठरली आहे.
भारतीय विषयसामग्री निर्मात्यांनी बजावलेली ही एक प्रभावी आणि एक अविश्वसनीय कामगिरी आहे. या यादीत भारतीय विषयसामग्रीच्या एकत्रितपणे सुमारे १० वेब मालिका आहेत.
‘द व्हायरल फीव्हर’ अर्थात ‘टीव्हीएफ’ हे त्यांच्या मालिकांमुळे सर्वपरिचित नाव बनले आहे. या विषयसामग्री निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या, प्रामुख्याने आपल्या देशाच्या युवा प्रेक्षकांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम लक्षात घेत त्यांना आवश्यक ठरणाऱ्या आणि रूचणाऱ्या विषयांचा मालिकांमध्ये परिचय करून देत स्वत:चे अभिनव स्थान निर्माण केले आहे. ते या पिढीची नस ओळखत, युवा पिढीला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर बेतणारी मालिका बनवणारे निर्माते आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यात प्रभुत्व संपादन केले आहे. हेच कारण आहे की, ‘टीव्हीएफ’च्या जास्तीत जास्त मालिकांना सर्वोच्च ‘आयएमडीबी’ रेटिंग प्राप्त होऊन ते सर्वांच्या पुढे आहेत. आणखी एक लक्षणीय मैलाचा दगड जोडत, ‘टीव्हीएफ’चा ‘सपने वर्सेस एव्हरीवन’ ही जागतिक स्तरावर ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांच्या यादीत स्थान पटकावणारी सातवी ‘टीव्हीएस’ मालिका बनली आहे. जागतिक स्तरावर विषयसामग्री क्षेत्रात ‘टीव्हीएफ’ने प्राप्त केलेल्या वर्चस्वाची ही जणू साक्ष आहे.
आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांच्या सर्वकालीन यादीवर नजर टाकल्यास ‘टीव्हीएफ’ची जागतिक मनोरंजन जगतावर मजबूत पकड असल्याचे लक्षात येते. सर्वात लोकप्रिय २५० मालिकांच्या यादीत ‘टीव्हीएफ’च्या जास्तीत जास्त मालिकांचा समावेश झालेला आहे. म्हणजे, टीव्हीएफ’ची ‘अॅस्पिरंट’ ही मालिका- १११ व्या स्थानी वर, त्यांचीच ‘पिचर’ मालिका- ५४ व्या स्थानी, ‘कोटा फॅक्टरी’- ८० व्या स्थानी, ‘गुल्लक’- ८६ व्या स्थानी, ‘ये मेरी फॅमिली’- १४६ व्या स्थानी, ‘पंचायत’- ८८ वर, आता, ‘सपने वर्सेस एव्हरीवन’- या मालिकेनेही स्थान प्राप्त केले आहे. हे सर्व शो ‘टीव्हीएफ हाऊसचे’ असून त्यांना सर्वात जास्त रेटिंग आहे. हेच कारण आहे की, ‘टीव्हीएफ’ इतर प्रॉडक्शन हाऊसेसच्या तुलनेत अव्वल स्थानी आहे. या सर्व मालिकांना केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रसिकांचे प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद लाभला आहे.
‘सपने वर्सेस एव्हरीवन’ या मालिकेने अधिकृतपणे ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांच्या यादीत प्रवेश केला आहे आणि सध्या ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांमध्ये सर्वोच्च रेटिंग संपादन केले आहे. प्रेक्षकसंख्या, प्रेक्षकांचा सहभाग, सर्वोच्च रेटिंग, प्रेक्षकांची विस्मयकारक समीक्षा आणि तांत्रिक पैलू या सर्व परिमाणांमध्ये या मालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या पिढीचे विषय पेश करणारे ‘टीव्हीएफ प्रॉडक्शन हाऊस’ हे केवळ वर्चस्व गाजवत नाही तर आशय क्षेत्रावर पूर्ण ताकदीने अधिराज्य करत आहेत, ही खरोखरच एक मोठी कामगिरी आहे. या पिढीतील युवावर्गाच्या आशा-आकांक्षा आणि समस्यांशी अतूट नाते जोडणाऱ्या मालिका पेश करून ‘टीव्हीएफ’ने प्रेक्षकांच्या विविध भावभावनांना आणि जगण्याला हळुवार स्पर्श केला आहे. याच कारणाकरता ‘टीव्हीएफ’ इतरांहून अव्वल आहेत. एखाद्या प्रॉडक्शन हाऊसने आनंद साजरा करणे ही काही सर्वसामान्य बाब नाही, पण ‘टीव्हीएफ’ने ही विस्मयकारक झेप घेतली असून, यशाचे स्वतःचे परिमाण सिद्ध केले आहे.