जिल्हा रूग्णालयालाच आहे ‘उपचारांची’ गरज
सातारा :
सातारा जिल्ह्यातील सर्व सामान्य गोरं गरीब रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला घाणीच्या साम्राज्याचा विळखा पडला आहे. येथील ड्रेनेज उघड्यावर वाहू लागल्याने वाहणाऱ्या महिल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्ण नातेवाईकांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून उभारलेल्या सर्व साधारण रूग्णालय परिसरात आज घाणीचे साम्राज्य पसरल्याने क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावाने सुरू असणाऱ्या रुग्णालयात आज नाक दाबून बुक्क्यांचा मार,डासांमुळे डेंगू होण्याचा धोका उदभवला आहे. सर्व सामान्य रुग्ण व नातेवाईकांना घाणीच्या परिसरात उपचार करताना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल माहिती असून देखील वारंवार डोळेझाक करणाऱ्या व फक्त कागदी घोडे नाचवणार्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांना बांधकाम विभागाने कोलदंडा देत असून वेळोवेळी दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवली. मात्र लिफ्ट बंद व ड्रेनेज चा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी तात्पुरता मलम लावऊं फक्त खाबूगिरी होते का असा प्रश्न भेडसावतो? मात्र येथील प्रश्न कायमचा तडीस कोण नेणार हा आजही रुग्ण नातेवाईक प्रश्न विचारत आहेत.
याठिकाणी उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर उपचार घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, उपचारासाठी येणार्या वृध तसेच महिला प्रसुती विभागात जाण्यासाठी असणारी लिफ्ट बंद असल्यामुळे रूग्णांना कसरत करुन न्यावे लागते , तर रूग्णालय परिसरात ड्रेनेज लाईन फुटल्याने व घाणीचे साम्राज्य वाढल्याने जिल्हा रूग्णालयावरच उपचार करण्याची वेळ आली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली . यामुळे जिल्हा रुग्णालयालाच उपचाराची गरज निर्माण झाली असताना गोरगरीब रुग्णाची होणारी हेळसांड प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दूर करणार का असा प्रश्न निर्माण होत आहे?