मर्यादित परवानगी, उत्खनन मात्र बेसुमार!
सातारा (महेश पवार) :
करंडी ता. सातारा येथे ठराविक मर्यादेत उत्खननासाठी परवानगी असताना एका व्यावसायिकाने बेसुमार उत्खनन करुन शासनाच्या नियम व अटींना ठेंगा दाखविला आहे. हा गंभीर प्रकार प्रशासकीय यंत्रणेला दिसत का नसावा याचेच आश्चर्य स्थानिकांना वाटत आहे.
करंडी येथे एका व्यावसायिकाला ठराविक मर्यादेत जमीन लेवल करण्यासाठी उत्खननाची प्रशासनाकडून परवानगी असताना त्याने नियम व अटींचा भंग केला असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. पोकलेन व जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस बेसुमार उत्खनन सुरु असले तरी प्रशासकीय यंत्रणेला मात्र याचा थांगपत्ता नसावा याचेच लोकांना आश्चर्य वाटत आहे.
सर्वसामान्य मग तो एखादा शेतकरी जरी असला तरी त्याला अधिकारी व कर्मचारी नियम व कायद्याचा बडगा दाखवितात. मात्र याला करंडी येथील नियमबाह्य बेसुमार उत्खनन अपवाद कसं काय ठरू शकतं असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.