उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका ?
सातारा (महेश पवार) :
सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य वाढल्याने या कार्यालय परिसराची उकिरडा पेक्षा वाईट अवस्था झाली आहे.
याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असून या ठिकाणी झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे या कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी तसेच या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी तसेच या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने भविष्यात या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो . भविष्यातील धोका ओळखून संबंधित अधिकाऱ्यांनी याठिकाणी साफसफाईची मोहीम आखण्याची गरज आहे.
या कार्यालयात स्वच्छता कर्मचारी नसल्याने ही अवस्था झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे…