शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात मंत्री पदासाठी रस्सीखेच?
सातारा:
भाजप सत्तेवर येते म्हटल्यावर सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे याचं बरोबर नव्याने सत्तेवर येत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांच्या दोघांपैकी मंत्री कोण होणार याकडे सातारा जिल्हा वासियांचे लक्ष लागलं असून , यामुळे जयकुमार गोरे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यांत मंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.
भाजपची ताकद वाढवण्यासाठी जयकुमार गोरे यांनाच मंत्री पद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असुन राष्ट्रवादी काँग्रेस च्या विरोधात नेहमी आक्रमक असणारे नेतृत्व आणि भाजप ची ताकद वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख असल्याने मंत्री पद जयकुमार गोरे यांनाच दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजप मध्ये जरी असले तरी गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या जिल्ह्यातील बैठकीत अनेकदा अनउपस्थित राहणं आंदोलनात सहभागी न होणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांशी जवळीक यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भोवणार की मंत्रीपद मिळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.