‘या’ सचिवाने शेतकऱ्यांसह संचालकांच्या नावावर केली बोगस पीक कर्ज ?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील जावली तालुक्यातील दापवडी गावच्या विकास सेवा सोसायटीचा सचिव गोपाळ बेलोशे यांनी गावातील शेतकरी नव्हे तर सोसायटी च्या संचालकांच्या देखील नावावर खोट्या सह्या करून बोगस पिकं कर्ज काढल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे . यामध्ये तर काही शेतकऱ्यांना बॅंकेची लोक वसुलीसाठी आली तेंव्हा समजले की त्यांच्या नावावर सचिवांनी बोगस कर्ज काढून त्यांना कर्ज बाजारी केले . सचिवांच्या या प्रतापाने शेतकरी अडचणीत आला असून सचिव मात्र गब्बर झाले आहेत.
दिवसेंदिवस जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत चालणाऱ्या विकास सेवा सोसायटी च्या सचिवांनी केलेल्या घोटाळ्यांची प्रकरणं बाहेर निघू लागली आहेत. कण्हेर खेड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे व जनजागृती ने विकास सेवा सोसायटी च्या माध्यमातून झालेल्या बोगस कर्ज प्रकरणी आता शेतकऱ्यांचा उठाव होऊ लागला आहे.
दापवडी येथील हिराबाई चंद्रकांत रांजणे ह्या शेतकरी महिला गावच्या विकास सेवा सोसायटी च्या संचालक असून विकास सेवा सोसायटी चा सचिव हा त्याच्या वारंवार सह्या घेऊन त्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून त्यांना देखील कर्जबाजारी केल्याचा त्यांचे म्हणणे आहे.
दापवडी येथील शेतकऱ्यांच्या नावे केलेल्या बोगस कर्ज प्रकरणी पिडित शेतकऱ्यांनी राष्ट्रमत शी बोलताना सांगितले की सचिव गोपाळ बेलोशे यांनी गावात पिण्याच्या पाण्याची ओरड आहे ,शेती बिन पाण्याची असताना देखील स्ट्रॉबेरी कर्ज कशी काढली गेली , विकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या माघारी सर्व व्यवहार केले आहेत यामध्ये जिल्हा बॅंकेचे अधिकारी देखील सहभागी असून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले , दरम्यान गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थानिक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी बैठक घेत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या . दरम्यान झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या शेतकऱ्यांची कैफियत मांडणार असल्याचा शब्द पिडित शेतकऱ्यांना उपजिल्हा प्रमुख संदीप पवार यांनी दिला .