गेल्या काही दिवसांपासून गोव्यात चर्चेत असलेल्या सोनाली फोगट खून प्रकरणातील मुख्य संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता गोवा पोलिस हरियाणाला रवाना झाले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने या प्रकरणातील संपूर्ण माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री आणि डीजीपी यांना दिली आहे. तसेच गुन्ह्यात समावेश असलेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. असं ही ते यावेळी म्हणाले.
या गुन्ह्यात ज्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशा गुन्हेगारांची धरपकड पोलिसांनी सुरुच ठेवली आहे. गुन्ह्याशी निगडित कर्लिसचा मालक तसेच पेडलर रामदास मांद्रेकर व दत्तप्रसाद गावकर यांच्यानंतर आणखी कोण यात सहभागी आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.