‘कान्स’मध्ये सत्यजित रे यांच्या ‘प्रतिद्वंदी’चे विशेष स्क्रीनिंग
नवी दिल्ली :
भारत यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes festival) सहभागी होणार आहे. यंदा 17 मे ते 28 मे या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवात बॉलीवुडची मस्तानी ‘दीपिका पदुकोण’ (Deepika Padukone) ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
कान्स (Cannes Festival) चित्रपट महोत्सवात ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ या सिनेमाचे स्क्रीनिंग होणार आहे. तसेच ‘सत्यजित रे’ यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा चित्रपट देखील या महोत्सवात दाखवला जाणार आहे. सत्यजित रे यांचा हा चित्रपट बंगाली लेखक सुनील गंगोपाध्याय यांच्या कथेवर आधारित आहे. या सिनेमाने 1971 साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धृतिमान चॅटर्जी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांना फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. यंदाचा फिल्म फेस्टिव्हल खूप खासअसणार आहे. भारताच्या ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ (All That Breathes) या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन शौनक सेन यांनी केले आहे.