google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा

‘स्टार्टअप 20’ करणार देशांतील स्टार्टअप्ससाठी 1 ट्रिलियन डॉलरचे सहाय्य…

पणजी :

जागतिक स्तरावर स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य बळकट करण्याच्या आणि प्रयत्नांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने गोव्यातील स्टार्टअप20 प्रतिबद्धता गटाच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी महत्त्वपूर्ण चर्चा आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळे आणि स्टार्टअप20चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव यांच्यात प्रमुख जाहीरनामे आणि धोरणात्मक भागीदाऱ्यांवर भर देणाऱ्या क्लोज डोअर बैठकांनी झाला.

या दिवसाच्या शेवटी झालेल्या वार्ताहर परिषदेत डॉ. चिंतन वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात झालेली प्रगती आणि धोरणविषयक परिपत्रक यासंदर्भात माहिती दिली.या परिपत्रकाबाबत शिष्टमंडळातील सर्व सदस्यांमध्ये झालेल्या मतैक्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. हा करार म्हणजे जी20 देशांचा जागतिक पातळीवर स्टार्टअप परिसंस्थांना चालना देणारा एक महत्त्वाचा क्षण ठरला. डॉ. वैष्णव यांनी हा महत्त्वाचा टप्पा साध्य करण्यात जी20 देशांदरम्यान झालेल्या प्रदीर्घ चर्चा आणि एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरल्यावर भर दिला.

आपल्या निवेदनात डॉ. चिंतन वैष्णव यांनी या परिपत्रकात नमूद केलेल्या विशिष्ट मुद्यांचे महत्त्व अधोरेखित केले. स्टार्टअप्ससाठी एका चौकटीची निर्मिती आणि स्वीकृती, स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी संस्थांच्या आणि परिसंस्थांच्या जाळ्याची निर्मिती, भांडवलात आणि उपलब्धतेत वाढ, स्टार्टअप्ससाठी बाजार नियमनात शिथिलता आणि स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अतिशय कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या समुदायांच्या समावेशाला प्राधान्य त्याचबरोबर जागतिक महत्त्वाच्या स्टार्टअप्समध्ये वृद्धी या मुद्यांचा यामध्ये समावेश होता. स्टार्टअप्सना नवोन्मेषासाठी, वाढीसाठी आणि प्रभावी पद्धतीने जागतिक आव्हानांची हाताळणी करण्यासाठी सक्षम करण्याचा या उपाययोजनांचा उद्देश आहे.

डॉ. वैष्णव यांनी जी 20 देशांना त्यांच्या स्टार्टअप परिसंस्थेच्या वचनबद्धतेसाठी एकत्र येऊन कृती करण्याचे महत्वपूर्ण आवाहन केले. त्यांनी 2030 पर्यंत स्टार्टअप परिसंस्थेसाठी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या भरीव रकमेच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडला.


धोरण परिपत्रकात नमूद केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रतिनिधींनी उत्साह आणि वचनबद्धता व्यक्त केली त्यासह दिवसाचा शेवट सकारात्मकतेने झाला. हा करार स्टार्टअप 20 समुदायाचा जागतिक स्तरावर स्टार्टअप्सचा शोध घेण्यावर, त्यांना सहकार्याने निधी पुरवण्यासाठी, संदर्भानुसार मार्गदर्शन करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणीत करण्यातील आत्मविश्वास दर्शवतो. जी 20 राष्ट्रांनी स्टार्टअप्सची जोपासना आणि समर्थन करण्याच्या त्यांच्या उद्दिष्टामध्ये लक्षणीय प्रगती करत एक उत्साही आणि समृद्ध जागतिक स्टार्टअप परिसंस्थेसाठी मंच तयार केला आहे.

जी 20 च्या स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाची गोवा संकल्पना येथे आज असीम ऊर्जा आणि दृढनिश्चयाच्या वातावरणात यशस्वी सांगता झाली.

जागतिक स्टार्टअप परिसंस्थेची वाढ आणि नवोन्मेष वर्धित करण्याच्या चर्चेदरम्यान सर्व प्रतिनिधींनी ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. प्रतिनिधींनी पीडित कुटुंबे आणि संपूर्ण देशासमवेत असल्याची भावना व्यक्त करत सहानुभूती व्यक्त केली. कठीण काळात समुदायांना पाठिंबा देण्याचे आणि उत्थान करण्याचे महत्त्व ओळखून, या प्रतिनिधींनी वाहतूक पायाभूत सुविधांसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला.

स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाची शिखर बैठक गुरुग्राम येथे 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!