उदयनराजेंच्या उमेदवारीला खो घालणारे झारीतले शुक्राचार्य कोण?
सातारा (महेश पवार) :
सातारा लोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांना मिळावी म्हणून ते आणि त्यांचे समर्थक आटोकाट प्रयत्न करत आहेत . परंतु उदयनराजे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून बोटावर मोजण्या एवढ्या झारीतल्या शुक्राचार्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उदयनराजेंबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट पाठवल्यामुळे उदयनराजेंना उमेदवारी मिळत नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सातारा कार्यकारणी मधील हे चार टके कोण याबाबत जोरदार चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात रंगू लागली आहे . हे चार जण म्हणजे भाजपा सातारा जिल्हा कार्यकारणीतील काही प्रमुखपदावर असलेले पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.
या चार जणांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना मलई खाता येणार नाही, स्वतःची खिसे भरता येणार नाहीत, म्हणून उदयनराजेंना उमेदवारी नको असा चुकीचा रिपोर्ट भाजपा पक्षासाठी पाठवल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रवेश केल्यानंतर लगेचच खासदार उदयनराजे भोसले यांनीही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला होता त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळणार याची 100% खात्री सर्वांनाच होती. परंतु भाजपा जिल्हा कार्यकारणीमध्ये असलेल्या चार टाग्यांमुळे उदयनराजेंची उमेदवारी कापली गेली असे बोलले जात आहे . स्वतः आमदार शिवेंद्रराजे भोसले हे उदयनराजे यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही असल्याचे दिसून येत आहे . असे असतानाही खासदार उदयनराजे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून हे चार जण व अन्य एक वरिष्ठ नेता यांनी चंग बांधला आहे.
त्यानुसारच सुरुवातीपासून उदयनराजेंना तिकीट मिळू नये म्हणून या चार जणांनी पक्षश्रेष्ठींकडे चुकीचा रिपोर्ट पाठवल्याचे बोलले जात आहे . या चार जणांना पक्षातून हाकलून देण्याची मागणी ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्ते करत आहेत . मात्र बोलायचे कुणी असा प्रश्न आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला या चार टग्यांमुळे लागलेली कीड दूर करायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी निष्ठावंत कार्यकर्ते नाव न सांगण्याच्या अटीवर करत आहेत.
…