‘गावातील शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावं देणार’
पणजी:
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पणजी येथे मुख्यमंत्री सावंत यांनी तिरंगा फडकावला; रस्ते, हवाई, जल कनेक्टिव्हिटीसाठी सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे; समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना घेऊन जात आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
ते पुढे म्हणाले, भारत ही लोकशाहीची जननी आहे. दरम्यान, गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ गावांमधील शाळांना हुतात्म्यांची नावं देणार अशी घोषणा त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी एक्स्प्रेशनल डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून मागासलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्यासाठी अभियान सुरु केलं. मात्र गोवा हे लहान राज्य असल्याने दोनच जिल्हे आपल्या राज्यात आहे. त्यामुळे आम्ही मागासलेल्या गावांच्या विकासासाठी एक्स्प्रेशनल व्हिलेज ही संकल्पना राबवत आहोत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी येथील निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी पोलीस प्रशासन आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज गोव्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.