
वार्षिक रथोत्सवात समितीचा खोडा?
सध्या राज्यात विविध देवस्थानाच्या कालोत्सव, रथोत्सवाची लगबग सुरू आहे. अशावेळी प्रिओळातील एका देवळाच्या कालोत्सवात वाड्यावरील तरुणांनी रथ खेळवण्याची तयारी केली, पण देऊळ समितीने तरुणांना असे करायला सकाळी बंदी घातली. त्यानंतर तरुण संध्याकाळी परत आले, सकाळी बाचाबाची झाल्यामुळे संध्याकाळी समितीने पोलीस फाटा मागवला. असे असतानादेखील, तरुणांनी मोठ्या उमेदीने वर्ष परंपरेने रथ खेळवला. असे झाले तरी, गावकऱ्यांना मात्र देऊळ समितीने अशा प्रकारे तरुणांना रथ खेळवण्यात अटकाव करणे मात्र आवडलेले नाही. स्थानिक आमदार सध्या गोव्यात नसल्याने काही हितशत्रू मुद्दाम अशाप्रकारे आपला अजेंडा पुढे दामटवण्यासाठीच आणि आपली हुकूमशाही राबवण्यासाठीच
देऊळ समिती अशा पद्धतीने वर्ष परंपरेत मुद्दामहून खोडा घालत आहेत, अशी चर्चा सध्या प्रियोळात सुरू आहे.