google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘का’ दिला केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा?

एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे.

– अरुण गोयल यांनी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

– अरुण गोयल हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे.

– अरुण गोयल हे दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष होते. ते कामगार आणि रोजगार मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार राहिले आहेत. ते अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागात सहसचिव होते.

– २०२२ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातही काम केले आहे.

– सध्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत ज्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपणार आहे.

– यानंतर अरुण गोयल हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या शर्यतीत होते. निवडणूक आयुक्त किंवा सीईसी या पदावर ६ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत काम करता येते.

– निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांच्या नियुक्तीला २०२२ मध्ये सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यांच्या निवडीवरून वाद झाला होता.

– मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती. अरुण गोयल यांची सरकारने घाईघाईने नियुक्ती केली नाही, तर त्यांचा कार्यकाळ २ वर्षांपेक्षा थोडा जास्त असेल, असे खंडपीठाने म्हटले आहे.

– सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीकडून केली जाईल. जेणेकरून निवडणुकीचे पावित्र्य राखले जाईल.

काँग्रेसने निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्ष संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता असावी. वेणुगोपाल यांनी X वर या संदर्भात पोस्ट केली आहे. ‘जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. निवडणूक आयोगासारखी घटनात्मक संस्था कशी काम करते? यात पारदर्शकता अजिबात नाही. सरकार निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!