‘हि’ कंपनी नेणार दहा कोटी कुटुंबांपर्यंत एलआयसी आयपीओ
मुंबई :
ग्रामीण भागातील नागरिकांना ‘एलआयसी आयपीओ’साठी अर्ज करण्याची सुविधा प्राप्त व्हावी, याकरीता ‘स्पाइस मनी’ या भारतातील बॅंकिंग क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या अग्रगण्य ग्रामीण फिनटेक कंपनीने ‘रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड’ (आयबीएल) या कंपनीशी भागीदारी केली आहे. ही एकमेवाद्वितीय अशी गुंतवणुकीची संधी असल्याने आपण हा पुढाकार घेतला असल्याचे ‘स्पाइस मनी’तर्फे आज सांगण्यात आले.
या सहयोगाच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना गुंतवणुकीच्या संधींमध्ये समान हिस्सा मिळावा आणि अशा प्रकारे, ग्रामीण-शहरी भेद दूर करण्यासाठी आणि आर्थिक समावेशनात वाढ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले जावे, असे ‘रेलिगेअर ब्रोकिंग’ व ‘स्पाइस मनी’ यांचे समान उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण पिन कोड क्षेत्रांतील ९५ टक्के भागांमधील नागरिकांना भविष्यकाळात इक्विटी, म्युच्युअल फंड, कमोडिटी, करन्सी आणि एनपीएस या साधनांमध्ये गुंतवणूक करता यावी, संपत्ती निर्माण करता यावी, याकरीता ‘फिजिटल प्लॅटफॉर्म्स’च्या माध्यमातून भांडवली बाजारातील संधी उपलब्ध करण्यावर या भागीदारीतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. ही व्यावसायिक भागीदारी आर्थिक बाजारात नव्याने शिरकाव करणाऱ्या ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक समावेशनाचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करेल.
‘रेलिगेअर ब्रोकिंग’ ही कंपनी सध्या देशातील चारशेहून अधिक शहरांमध्ये अकराशेहून अधिक शाखा आणि व्यावसायिक भागीदारांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे १० लाखांहून अधिक ग्राहकांना डीमॅट सेवा देत आहे. दुसरीकडे, ‘स्पाइस मनी’ ही १० लाखांहून अधिक व्यापाऱ्यांचे (ज्यांना स्पाइस मनी अधिकारी म्हणतात) विस्तृत नेटवर्क असणारी अग्रगण्य ग्रामीण फिनटेक कंपनी, भारतातील ७००हून अधिक जिल्ह्यांमधील व दुर्गम भागातील १० कोटी कुटुंबांना सेवा देत आहे. या ग्रामीण भारताला भांडवली बाजारात थेट प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘रेलिगेअर ब्रोकिंग’ आणि ‘स्पाइस मनी’ यांच्यातील ही भागीदारी सहाय्यभूत ठरणार आहे.
सन २०२१ हे वर्ष दोन दशकांतील “सर्वोत्तम आयपीओ वर्ष” ठरले असल्याची नोंद भारताच्या आर्थिक इतिहासात झाली आहे. यामध्ये नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्यांनी आघाडी घेतली होती, तथापि पुरेसी जागरुकता, संधी आणि मदत यांच्या अभावामुळे देशाच्या ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांची टक्केवारी या आयपीओंमध्ये अत्यंत कमी आहे. या पार्श्वभूमीवर, ‘एलआयसी’च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या, पण ती कोठे करायचे हे माहीत नसलेल्या ग्रामीण नागरिकांना मदत करण्यासाठी, स्पाइस मनीचा सर्वाधिक समावेशक आणि विश्वासार्ह समुदाय, ज्यांच्याकडे आदरणीय बँकिंग प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते ते १० लाख अधिकारी, संपर्कबिंदू म्हणून काम करेल. या नागरिकांना डीमॅट खाते उघडण्यासाठी आणि ‘एलआयसी आयपीओ’साठी अर्ज करण्यास आणि भविष्यात इतर उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यास ‘स्पाइस मनी अधिकारी’ मदत करतील.
‘स्पाइस मनी’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले, “देशातील सर्वात मोठा आयपीओ भारताच्या दुर्गम भागात नेण्यासाठी ‘रेलिगेअर ब्रोकिंग’सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘स्पाइस मनी’मध्ये आम्ही देशासाठी आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या मोहिमेवर असतो. आमची ही भागीदारी आमच्या ‘मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म’द्वारे ग्रामीण नागरिकांना मेगा आयपीओ आणि भविष्यातील इतर भांडवली बाजाराशी संबंधित उत्पादनांमध्ये सहभागी होण्याची संधी देईल. ‘एलआयसी’सारख्या देशव्यापी, विश्वासार्ह ब्रँडच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करताना ग्रामीण नागरिकांना गुंतवणुकीच्या अशा संधींविषयी माहिती मिळू शकेल, ज्यांबद्दल ते सध्या अनभिज्ञ आहेत.”
“बहुसंख्य ग्रामीण कुटुंबांमध्ये आर्थिक साक्षरता नसते आणि अनेकदा ते त्यांचे पैसे ठेवण्यासाठी बँकांच्या ठेवींना प्राधान्य देतात. त्यातून त्यांना कमी व्याजदरावर समाधान मानावे लागते. भांडवली बाजारात स्मार्ट गुंतवणूक करून संपत्ती वाढवण्याची मोठी संधी त्यांना गमवावी असते. अशा संधींचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतल्यास, त्यांच्या स्वतःच्या आर्थिक विकासातच नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होण्यातही मदत होईल. ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या आणि ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याच्या देशाच्या उद्दिष्टात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. आमच्या भागीदारीमुळे लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी परस्पर समन्वय साधता येईल. डिजिटल आणि तांत्रिक नाविन्यतेला पुढे नेत, सर्व ग्रामीण आर्थिक गरजांसाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म बनण्याचे ‘स्पाइस मनी’चे उद्दिष्ट आहे,” असे संजीव यांनी पुढे नमूद केले.
या भागीदारीच्या घोषणेबाबत ‘रेलिगेअर ब्रोकिंग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन आगरवाल म्हणाले, “आम्हाला स्पाइस मनीसोबत हातमिळवणी करताना आनंद होत आहे. ‘एलआयसी आयपीओ’ची वाटचाल सुरू असताना, नवीन गुंतवणूकदार आणि ‘एलआयसी’चे पॉलिसीधारक यांच्यासाठी मोठी संधी वाट पाहत आहे. ‘रेलिगेअर’ आणि ‘स्पाइस मनी’ या दोन्ही कंपन्या ग्रामीण भारताचे आर्थिक समावेशनाचे मॉडेल तयार करण्यात, नवीन युगातील तंत्रज्ञानाची मानवी सहाय्याने जोड देण्यात आणि घर-घर डीमॅट अकाउंट उघडून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका संयुक्तपणे बजावतील. ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेला प्रत्येक गुंतवणूकदार स्पाइस अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘डायनॅमी अॅप’वर डीमॅट खाते अगदी सुरळीतपणे उघडू शकतो आणि गुंतवणूक साधनांच्या श्रेणींबाबत माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो.”
‘रेलिगेअर ब्रोकिंग’चे सीओओ गुरप्रीत सिदाना म्हणाले, “गुंतवणुकीची सरळ, साधी प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण सेवा देण्याचे आमचे वचन पुढे ठेऊन, यावेळी आम्ही सबसे सस्ता डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी ‘स्पाइस मनी’सह मोठ्या प्रमाणावर ‘फिजिटल डीआयवाय’ सुविधा तयार करीत आहोत. जनसामान्यांसह बाजारपेठेत नव्याने गुंतवणूक करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ‘रेलिगेअर ब्रोकिंग’ने अलीकडेच काही नवीन ऑफर्सची घोषणा केली आहे. ‘डिलिव्हरी ट्रेड्स’वर शून्य ब्रोकरेज, नफा न होणाऱ्या ‘इंट्राडे ट्रेड्स’वर शून्य ब्रोकरेज आणि ५ रु. प्रति लॉट या दराने ‘ऑप्शन्स’चे ट्रेडिंग अशा या नव्या ऑफर्स आहेत. अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानामुळे डीआयवाय स्वरुपात खाते उघडण्याची प्रक्रिया आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म या गोष्टी सहज-सुलभ झाल्या आहेत, तसेच त्यातून ट्रेडिंग करण्याचा अनोखा अनुभवही मिळत आहे. गुंतवले जाणारे पैसे किंवा स्थान यांचा विचार न करता कोणताही गुंतवणूकदार भांडवली बाजाराशी निगडीत संधींमध्ये सुरळीतपणे व परवडणाऱ्या दरांत सहभागी होऊ शकतो.”