गोवा

एसआयआर-२०२५ मधील तफावत निकाली काढल्याचा आदेश अत्यंत महत्त्वाचा : विशाल पै काकोडे

मडगाव – एसआयआर २०२५ मध्ये नोंदवलेल्या कोणत्याही तफावतीची पडताळणी होऊन ती निकाली काढल्यानंतर नागरिकांनी ईआरओ वा एईआरओ कडून लेखी आदेश घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे. त्यांनी गोव्याचे इलेक्टोरल रोल ऑब्झर्व्हर संदीप जॅकिस (आयएएस) यांना वैयक्तिक लक्ष घालून मतदार नावनोंदणीची ही संपूर्ण प्रक्रिया अधिक नागरिक-अनुकूल करण्याचे व ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बाळांच्या माता व दिव्यांग व्यक्तींना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.


विशाल पै काकोडे यांनी सांगितले की मडगाव येथील त्यांच्या भागातील बिएलओ कडून त्यांना शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यात त्यांच्या नावात व त्यांच्या वडिलांच्या नावात तफावत असल्याचे नमूद करून मंगळवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत एईआरओ-मडगाव यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. संबंधित बीएसओने ही तफावत दूर करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते.


ते म्हणाले की पुढील तीन दिवस सुट्ट्या असल्याने त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळवता आले नाही. त्यांनी एईआरओना असेही विचारले की त्यांनी मडगावनध्ये तीन निवडणुकांत उमेदवाराचे ‘इलेक्शन एजंट’ म्हणून काम केले असताना त्यांच्या नावाची अशी तफावत आता अचानक कशी काढली गेली? त्यांनी एईआरओच्या  निदर्शनास आणून दिले की अशा किरकोळ बाबी बीएलओ स्तरावरच निकाली काढल्या पाहिजेत आणि नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान बाळांच्या मातांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रवास करण्यास भाग पाडू नये.


विशाल पै काकोडे यांनी पुढे सांगितले की त्यांनी एईआरओकडे एसआयआर-२०२५ मध्ये नोंदवलेली तफावत निकाली काढण्यात आल्याने त्यांचे नाव मतदार यादीत कायम राहील, असे स्पष्ट करणारा लेखी आदेश देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर एईआरओनी सदर आदेश आदेश जारी केला. विशाल पै काकोडे यांनी सर्व नागरिकांना असे लेखी आदेश घेण्याचा आग्रह धरावा, जेणेकरून मतदार यादीतील त्यांच्या नावाच्या स्थितीबाबत स्पष्टता व निश्चितता राहील, असे आवाहन केले आहे.


ते पुढे म्हणाले की गोव्याचे इलेक्टोरल रोल अधिकारी संदीप जॅक्स (आयएएस) यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करून ही प्रक्रिया सुलभ, मानवी व नागरिक-अनुकूल करावी आणि ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान बाळांच्या माता व दिव्यांग व्यक्तींना किरकोळ तफावतींसाठी अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!