भर कोर्टात मटका किंगने उगारला पोलिसांवर हात
सातारा (महेश पवार) :
शहरात आणि अनेक जिल्ह्यांत मटका चालवणारा मटका किंग समीर कच्छी ने चक्क कोर्टात पोलीसांवर हात उचलला , समीर कच्छी च्या मुलाला भांडणाच्या केस मध्ये पोलीसांनी अटक केली होती त्याला पोलीस कोर्टात घेऊन गेले होते यावेळी समीर कच्छी आपल्या मुलाला कोर्टात काहीतरी देण्यासाठी गेला असता पोलीसांनी अटकाव केला म्हणून समीर कच्छी ने अटकाव करणार्या पोलीसांवर हात उचलला आणी तिथून पळून गेला.
मटका किंग म्हणून ओळखणार्या सलीम वर शेकडो तक्रारी असताना सातारा पोलीस नेमके हतबल का ? आहेत . सातारा पोलीसांची अब्रू लक्तरे काढणार्या सलीम कच्छी च्या पोलिस मुसक्या कधी आवळणार? असा प्रश्नही नागरिक आता विचारू लागले आहेत.