अनधिकृत हॉटेल्समुळे ‘कास’चा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा जाणार?
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यातील कास पठाराला जागतिक पातळीवर ओळखले जाते देश विदेशातील लाखो पर्यटक या कास पुष्प पठारावर भेट देण्यासाठी येत असतात . येथील जैवविविधता आणि निसर्गाचा घोट घेण्याचं काम कास पठारावर सध्या सुरू असताना देखील वन विभाग महसूल विभाग सध्या अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.
सातारा कास रस्त्यावर पाऊला पाऊलावर बेकायदेशीर हॉटेल फार्म हाऊस उभी होत आहेत आणि झाली आहेत , तसेच याठिकाणी बेसुमार वृक्षतोड आणि उत्खनन होत असल्याने कास पठारावरील वनसंपदा धोक्यात आली आहे . तर वन विभाग आणि महसूल विभाग याकडे गांभीर्याने बघत नसल्याने भविष्यात कास पठाराला मिळालेला वर्ल्ड हेरिटेज दर्जा जातो की काय ? अशी परिस्थिती आहे.
यामुळे कास पुष्प पठारावर वाढत चाललेल्या बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या हॉटेल्स मुळं कास पुष्प पठार हे पुष्प पठार म्हणून नाही तर हॉटेल्स चे पठार म्हणून ओळखले जाऊ लागले यामुळे आता कास पठाराला मिळालेला जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.