‘या’ सिनेमात नायकच झाला निगेटिवमधून गायब…
रजत कपूर दिग्दर्शित RK/RKAY,
ही आगामी भारतीय चित्रपट निर्मितीतील विनोदी ही एक कथा आहे जी प्रेक्षकांना चित्रपट जगतामागील रहस्यात घेऊन जाईल. प्रेक्षकांना सस्पेन्ससह चित्रपट पाहण्यास भाग पाडणारा त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की हा चित्रपट एका चिंतीत दिग्दर्शकाच्या (आरके) एका वेधक कथेभोवती फिरतो ज्याने नुकतेच त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, परंतु या कथेला नवे वळण मिळते जेव्हा त्याला एडिटिंग रूममधून फोन येतो की, नेगटीव्हमधून नायक गायब झाला आहे. चित्रपटाची कथा पुढे सिनेजगतातील पडद्यामागील जगाचा वेध घेत ज्यात आरके आणि त्याची टीम नायकाचा शोध घेताना दिसतात.
ट्रेलर लिंक: https://youtu.be/CeMmqh1PtMo
रजत कपूरचा मल्लिका शेरावत अभिनित Rk/Rkay, हा चित्रपट 22 जुलै ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास पूर्णपणे सज्ज असून त्यापूर्वीच हा कॉमेडीपट शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, फ्लॉरेन्समधील रिव्हर टू रिव्हर यासह ऑस्टिन फिल्म फेस्टिव्हल आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अशा अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्समध्ये गाजला आहे.
प्रियांशी फिल्म्स (प्रियाम श्रीवास्तव आणि हर्षिता करकरे) निर्मित या चित्रपटात मल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शौरी, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजित देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘RK/Rkay’ रजत कपूर, मिथक टॉकी द्वारे लिहीले आणि दिग्दर्शित केले आहे आणि एनफ्लिक्स प्राइवेट लिमिटेड (नितीन कुमार आणि सत्यव्रत गौड) द्वारा प्रियाशी फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत आहे.