google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग पदच्युत?

नवी दिल्ली:

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या अफवा इंटरनेटवर मुख्यत: सोशल मीडियावर पसरल्या आहेत. क्षी जिनपिंग समरकंदमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी (SCO) गेले असताना त्यांना कट रचून पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये पसरले आहे.

या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताबाबत मौन बाळगले आहे. याबाबत चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केले नाही. मात्र, तरीही क्षी जिनपिंग यांना पदच्यूत केल्याचा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवा क्षी जिनपिंग यांच्याविरोधात रचल्या गेलेल्या कटाचा भाग असल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे. क्षी जिनपिंग यांना चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधून हटवण्यात आल्याचीही अफवा सोशल मीडियावर आहे.

समरकंदमधील कार्यक्रमाची औपचारिक सांगता न करताच निघालेल्या जिनपिंग यांना बीजिंगमध्ये पोहोचताच अटक करण्यात आली असून त्यांना घरात स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे. बीजिंग विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ६००० विमानांची उड्डाणं रद्द झाल्याचीही ट्विटर पोस्ट करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!