google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘वाळवंटी परिसर पर्यटनस्थळ करण्याचा विचार’

राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत असलेल्या विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल मंदिरासह वाळवंटी परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा विचार आहे, असे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घेतलेल्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मंत्री गावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. साखळी येथील रवींद्र भवनात हा सोहळा आयोजिण्यात आला होता.

या सोहळ्यास खास अतिथी म्हणून मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कारापूर-सर्वणचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश फातर्पेकर, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव नारायण सावंत, संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब आणि अधिकारी गायतोंडे उपस्थित होते. मंत्री गावडे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

बक्षिसांच्या रकमेत वाढ

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या हजारो भक्तगणांसह पर्यटकांना नौकाविहार स्पर्धेचा आणि कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे. तसेच स्पर्धक संस्थांच्या मागणीनुसार यापुढे नौकाविहार स्पर्धेच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री गोविंद गावडे यांनी केली. पुढच्या वर्षी प्रथम क्रमांकासाठी रोख 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धतील विजेते पुढीलप्रमाणे-प्रथम- तळखांबेश्वर बॉइज (पर्ये-सत्तरी), द्वितीय- कलियुगी बॉइज (विठ्ठलापूर), तृतीय- भूमी बॉइज (पर्ये), चौथे- एन.सी. ग्रुप (विठ्ठलापूर) आणि पाचवे- ओव्हरलॉक्ड (पर्ये). उत्तेजनार्थ-सारंग (होंडा-सत्तरी), भूतनाथ बॉइज (आमोणे), सिक्स ब्रदर्स (पर्ये-सत्तरी), त्रिपुरांतक (विठ्ठलापूर-साखळी) आणि युनिक बॉइज (पर्ये-सत्तरी).

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!