छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली : सुधांशू त्रिवेदी
भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (BJP Spokesperson Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला (Aurangzeb) पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोक माफीनामा लिहायचे असं विधान त्रिवेदी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा हा व्हिडिओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजप प्रवक्ता वेडाच असू शकतो.
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले, सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोक प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावरकरांनी ब्रिटिश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती, असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केले आहे.