केएफसी आणि मॅगी आले एकत्र
पणजी:
भूक लागली? तर मग, लेट्स केएफसी! कारण अगदी पहिल्यांदाच, २०२२ मधील सर्वात एपिक कोलॅब करत केएफसी इंडियाने चाहत्यांना केएफसी पॉपकॉर्न बाऊल मेड विथ मॅग्गीचा आस्वाद देण्यासाठी नेस्लेसोबत भागीदारी केली आहे. दोन प्रख्यात ब्रॅण्ड्सनी एकत्र येऊन सर्वात क्रिस्पी व स्लर्पी कॉम्बो सादर केला आहे – केएफसीचे सिग्नेचर चिकन पॉपकॉर्न व मॅग्गी नूडल्स एका परिपूर्ण बाऊलमध्ये. गरमागरम, स्टिमिंग, अत्यंत मसालेदार आणि स्लर्पी मॅग्गी नूडल्ससह बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्यूसी असलेले स्वादिष्ट चिकन पॉपकॉर्न हे लिमिटेड टाइमसाठी उपलब्ध असलेले बाऊल ऑफ हॅप्पीनेस निश्चितच तुमच्या मॅग्गी नूडल्स व केएफसी चिकनच्या प्रेमामध्ये अधिक क्रिस्पीनेसची भर घालेल.
या प्रख्यात सहयोगाबाबत बोलताना केएफसी इंडियाचे जीएम (GM) मोक्ष चोप्रा म्हणाले, “मॅग्गी व केएफसी हे दोन्ही प्रतिष्ठित ब्रॅण्ड्स आहेत, जे ग्राहकांना आवडतात आणि त्यांच्या प्रॉडक्टचा ते मनसोक्त आस्वाद घेतात. या एपिक कोलॅबसाठी आमचा सहयोग होणे निश्चितच होते आणि कदाचित आमचे चाहते त्याची दीर्घकाळापासून वाट पाहत होते. या भागीदाराचे रूपांतर एका अत्यंत स्वादिष्ट रेसिपीमध्ये झाले आहे. आम्हाला केएफसी व मॅग्गी चाहत्यांना लिमिटेड-एडिशन केएफसी पॉपकॉर्न बाऊल मेड विथ मॅग्गी सादर करण्याचा आनंद होत आहे. हा बाऊल निश्चितच तुमच्या ‘फिंगर लिकिन गुड’ टाइमला स्लर्पी ट्विस्ट देईल.’’
हा बाऊल दोन विशिष्ट, लोकप्रिय फ्लेवअर्समध्ये येतो – चिकन पॉपकॉर्न व वेज पॅटीसह. हा बाऊल निश्चितच तुम्हाला स्लर्पी व क्रिस्पी स्वाद देईल. चिकन पॉपकॉर्न मॅग्गी बाऊलची किंमत १५९ रूपयांपासून सुरू होते, तर वेज पॅटी मॅग्गी बाऊलची किंमत १२९ रूपयांपासून सुरू होते. हे क्रंची मसाल्याने भरलेले इनोव्हेशन देशभरातील सर्व ६०० हून अधिक केएफसी रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असेल. तुम्हाला डिलिव्हरी, टेकअवे, केएफसी टू यूअर कार/बाइकच्या माध्यमातून आणि डाइन-इनदरम्यान पूर्णत: कॉन्टॅक्टलेस व सुरक्षित पद्धतीने केएफसी पॉपकॉर्न मॅग्गी बाऊल मिळू शकतो.
गुगल प्ले व अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या नवीन सोईस्कर केएफसी अॅपच्या माध्यमातून देखील सर्व केएफसी फेवरेट्स सुलभपणे ऑर्डर करता येऊ शकतात.
तर मग, पुढच्या वेळेस तुमच्या भूकेसाठी केएफसीकडे एक उत्तम उपाय आहे;जस्ट किप काम अॅण्ड स्लर्प ऑन, कारण केएफसी पॉपकॉर्न बाऊल मेड विथ मॅग्गी तुमचा स्वप्नवत प्रॉडक्ट आहे!