उदयनराजेनी केले अमित ठाकरे यांचे कौतुक
सातारा (महेश पवार) :
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी रविवारी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली तेव्हा उदयनराजे यांनी ठाकरे यांना एक सुगंधी परफ्युम भेट दिला आता तू मोठा माणूस झाला आहेस तू आम्हा सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे असा ज्येष्ठत्वाचा सल्ला खासदार उदयनराजे यांनी दिला
अमित ठाकरे यांनी उदयनराजे यांची अनौपचारिक भेट साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा घडवून गेली मात्र ही गाठभेट राजकीय स्वरूपाची नव्हती ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती असे अमित ठाकरेंनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुनर्बांधणी करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते शनिवारी साताऱ्यात दाखल झाले आहेत त्यांच्या दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये रविवारी सकाळी पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले त्यानंतर त्यांनी तात्काळ जलमंदिर येथे येऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली ही भेट अतिशय अनौपचारिक स्वरूपाची होती.
अमित ठाकरे यांनी उदयनराजे भोसले यांचा भगवी शाल आणि पेढे देऊन सत्कार केला तर खासदार उदयनराजे भोसले यांनी अमित ठाकरे यांना एक खास ब्रँडचा परफ्युम भेट म्हणून दिला तू लहान राहिला नाहीस तर मोठा माणूस झाला आहेस सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणून हा परफ्युम दिला आहे यापुढे आपली राजकीय वाटचाल अशीच होत राहो अशा शुभेच्छा ही उदयनराजे यांनी दिल्या.
या भेटीवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले साताऱ्यात आलो तर राजेंना भेटलो नाही असे होऊ शकत नाही ही भेट राजकीय स्वरूपाची नव्हती तर ती खाजगी स्वरूपाची होती . खासदार उदयनराजे भोसले या भेटी संदर्भात बोलताना म्हणाले मला माझा मुलगा घरी आल्यासारखे वाटले आम्हीच सारख्या तरुण नेत्यांनी पुढे आली पाहिजे आणि लोकांची त्यांच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे ठाकरे करण्याचा इतिहास मोठा आहे प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे या सगळ्यांचा नावलौकिक त्यांनी केला पाहिजे अमित ठाकरेंचा फॅन फॉलोइंग सुद्धा जोरात आहे असे ते म्हणाले या भेटीदरम्यान अमित ठाकरे यांनी उदयनराजेंचा भ्रमणध्वनी वरून थेट राज ठाकरे यांच्याशी संपर्क करून दिला दहा मिनिटांच्या या संवादामध्ये उदयनराजे भोसले आणि राज ठाकरे यांनी सुद्धा एकमेकांशी ख्याली खुशाली विचारून वेगवेगळ्या विषयांवर राजकीय संवाद साधला.