google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘फ्रेंड्स’मधील अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन

नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लास वेगास येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मिडियावरून याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.

मॅथ्यू पेरी यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ रोजी विल्यमस्टाउन येथे झाला होता. ते १ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. मॅथ्यू पेरी अभिनेते जॉन बेनेट पेरी आणि कॅनडाचे पंतप्रधान पियरे ट्रूडो यांचे एकेकाळचे प्रेस सेक्रेटरी सुझान मेरी लँगफोर्ड यांचा मुलगा आहेत. ‘चार्ल्स इन चार्ज’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी अनेक कलाकृतींमधून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण त्यांना खरी प्रसिद्धी टीव्ही मालिका ‘फ्रेंड्स’मधून मिळाली. या मालिकेतील ‘चँडलर’ हे पात्र त्यांनी साकारलं. ही मालिका २२ सप्टेंबर १९९४ रोजी सुरू झाली आणि ६ मे २००४ रोजी संपली. ‘फ्रेंड्स’चे दहा सीझन आले. तर त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!