google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘हे’ आहे थलपथी विजयच्या आगामी चित्रपटाचे नाव…

थलापथी विजयचा बहुचर्चित आगामी चित्रपट ज्याचे तात्पुरते टायटल ‘थलापथी 67’असे ठेवण्यात आले होते, याचे ऑफिशल टायटल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेत, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल ‘लिओ’ आहे असे जाहीर केले आहे.

मेकर्सने नेहमीच चित्रपटाशी संबंधित अपडेट्स प्रेक्षकांना दिले आहेत. दरम्यान, या सिनेमाच्या टायटलबद्दल दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे टायटल ‘लिओ’ आहे अशी घोषणा केली आहे. अशातच, निर्मात्यांनी सिनेमाचा एक जबरदस्त टायटल प्रोमो जारी केला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये उत्तम बीजीएमसह (BGM) थलापथी विजयच्‍या काही ह्रदयस्पर्शी सीन्सची झलक पाहायला मिळेल. हा प्रोमो पाहून असे म्हणता येईल की ‘लिओ’हा चित्रपट निश्चितपणे 7 स्क्रीन स्टुडिओचा आणखी एक मास्टर पीस असल्याची हमी देतो.

थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘लिओ’हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची दर्शकांची उत्सुकता वाढत आहे. अशातच, 7 स्क्रीन स्टुडिओच्या ‘थलापथी 67’या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली असून, याचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन यांना पाहायला मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!