नितीश कुमार उद्या घेणार मोठा निर्णय…
Bihar CM Nitish Kumar: बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या युतीमधील भागीदार आणि लालू यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) मधील मंत्र्यांची हकालपट्टी करतील, अशी माहिती सूत्रांनी आज एनडीटीव्हीला दिली. दरम्यान, भाजप आणि नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा अंतिम करारही झाला आहे. बिहारमधील भाजपच्या सर्व आमदारांनी यापूर्वीच नितीश कुमार यांना पाठिंब्याची पत्रे दिली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, JD(U) प्रमुख – ज्यांनी (नितीश कुमार) ऑगस्ट 2022 मध्ये महागठबंधन किंवा महाआघाडीत सामील होण्यासाठी भाजपची साथ सोडली होती. त्यानंतर नितीश कुमारांनी RJD आणि काँग्रेससोबत आघाडी करत भाजपला मोठा धक्का दिला होता. त्यावेळी, त्यांनी भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी मोठा गेम केला होता. विशेष म्हणजे, त्यांनी कॉंग्रेस आणि लालू प्रसाद यांच्या पक्षाबरोबर सत्ता स्थापन केली होती. दरम्यान, 72 वर्षीय नितीश कुमार आता सत्तापालट यशस्वी करण्यासाठी थेट गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, नितीश कुमार उद्या JD(U) आणि भाजप आमदारांसाठी त्यांच्या घरी दुपारचे भोजण आयोजित करणार आहेत. त्यानंतर दोन्ही पक्षांचे आमदार राज्यपालांकडे पाठिंब्याचे पत्र देतील, असे सूत्रांनी सांगितले. नितीश कुमार हे आरजेडीमधून काढून टाकण्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या जागी भाजपच्या चेहऱ्यांना आणण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले. नवीन उपमुख्यमंत्री निवडण्यात त्यांचा मोठा वाटा असेल, असे नितीश कुमार यांचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या संभाव्य बाहेर पडण्याचा इशारा देत ते म्हणाले. 2025 नंतर, नितीश कुमार यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते.
तसेच, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, जे सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. सुशील कुमार यांच्या गळ्यात बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. नितीश कुमार पुन्हा एकदा सुशील मोदींची यांनी निवड करतील, अशी माहिती आहे. दरम्यान, बिहारमधील हे नवे राजकीय संकट नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. ज्यांचे सदस्य पंजाब आणि हरियाणामध्ये आम आदमी पार्टी (आप) आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आहेत. नितीश कुमार यांनी 2013 पासून भाजप, काँग्रेस आणि आरएलडी यांच्याबरोबर एकत्र येत आपली सत्तेतील उपस्थिती कायम ठेवली त्यामुळे त्यांना ‘पल्टू राम’ देखील म्हणतात. 2022 मध्ये भाजपशी फारकत घेतल्यानंतर, त्यांनी यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी सर्व विरोधी शक्तींना एकत्र आणण्यामध्ये पुढाकार घेतला होता.
दुसरीकडे, 13 जानेवारीची इंडिया आघाडीची बैठक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होती. त्या बैठकीत नितीश कुमार यांचे नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) नेते सीताराम येचुरी यांनी संयोजक म्हणून प्रस्तावित केले होते. विशेष म्हणजे, लालू यादव आणि शरद पवार यांच्यासह जवळपास सर्वच नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले होते. तथापि, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हस्तक्षेत करत म्हटले होते की, या निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागेल कारण तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नितीश कुमार यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप आहे.