पणजी :
आसगाव गोवा येथील सिली सोल कॅफे अँड बारला एफडीएचा परवाना केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीला देण्यात आल्याचा माहीती हक्क माध्यमातून खुलासा झाल्यानंतर देशातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल, श्रीमती इराणी यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी एआयसीसीचे माजी सचिव गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
‘आता एफडीए, आरटीआय आणि कंपनी नोंदणी दस्तावेजांनी पुष्टी केली आहे की ‘सीली सोल्स च्या स्मृती झुबिन इराणी या पॅथॉलॉजिकल खोटारड्या आहेत. आता हे आरशासारखे साफ आहे की सिली सोल्स बार अॅंड रेस्टॉरंट तिचे कुटुंब चालवत आहे. स्मृती इराणी यांनी आता जयराम रमेश, पवन खेरा व नेट्टा डिसोजा यांची माफी मागावी अशी जोरदार मागणी,” चोडणकर यांनी ट्विट द्वारे केली आहे.
चोडणकर यांनी विविध कागदपत्रांचा वापर करून श्रीमती इराणीचा पर्दाफाश केला होता. इराणी खोटे बोलत असल्याचे सांगून तिला पॅथॉलॉजिकल खोटारड्या म्हटले होते.
“आरटीआय दस्तावेजांनी आता सिद्ध केले आहे की ती पॅथॉलॉजिकल खोटारडी आहे. एफडीएने सत्य सांगितले आहे आणि आरटीआयने हे सत्य समोर आणले आहे, जे आता सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे”, चोडणकर म्हणाले.
काँग्रेस नेते शजयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांच्या विरोधात श्रीमती इराणी यानी कोर्टात धाव घेतली होती आणि त्यांच्यावर आपल्या कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप केला होता. चोडणकर म्हणाले की, तिचे कुटुंब सदर रेस्टॉरंट चालवते हे आता स्पष्ट झाले असल्याने स्मृती इराणी यांनी या काँग्रेस नेत्यांची माफी मागावी.
“जेव्हा कोणी बेकायदेशीर कामांमध्ये गुंतून निष्पापपणाचा आव आणतो, तेव्हा ते आरटीआयच्या खुलाशापासून पळ काढू शकत नाहीत”. त्यामुळे देशाशी खोटे बोलल्याबद्दल तिला बडतर्फ करण्याची मागणी चोडणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
“खोटारड्याने केंद्रीय मंत्री म्हणून राहू नये आणि मला खात्री आहे की, निती, नियत आणि नेता यांच्याबद्दल बोलणारे पंतप्रधान तिला नक्कीच काढून टाकतील”, असे चोडणकर शेवटी म्हणाले.