‘भाजप हा सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष’
Goa BJP : ख्रिस्ती अल्पसंख्याक आणि आदिवासी मतदारांचा बऱ्यापैकी भरणा असलेल्या त्रिपुरा राज्यांतील अल्पसंख्याक मतदारांनी जसा भाजपवर विश्वास दाखविला तसाच विश्वास गोव्यातील अल्पसंख्यांकांनी दाखवायला हवा अशी प्रतिक्रीया भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी व्यक्त केली.
त्रिपुरा आणि नागालँड ही इशान्य भारताची दोन्हीं राज्ये नुकतीच भाजपने सर केल्याच्या पार्शवभूमीवर बोलताना बार्बोजा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासवर्धित प्रशासनाला या दोन्ही राज्यांतील मतदारांनी दिलेला हा कौल आहे.
भाजप हा अल्पसंख्याक विरोधी पक्ष नसून तो सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष हे आता गोव्यातील अल्पसंख्यांकानीही पटवून घ्यायला पाहिजे.
येत्या वर्षी जी लोकसभा निवडणूक होणार आहे त्यात दोन्ही जागावर भाजप उमेदवार निवडून येण्याची गरज व्यक्त करताना मागच्या काही वर्षांत प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याने बरीच प्रगती केली आहे.
त्यासाठी केंद्राकडून खंबीर असा पाठिंबाही मिळाला आहे. हा पाठिंबा कायम राहण्यासाठी गोव्यातील जनतेने गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपला विजयी करण्याची गरज आहे. त्यासाठी गोव्यातील अल्पसंख्यांकानी भाजपला पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली.