लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत अखेर दक्षिण गोव्यातून अपेक्षेप्रमाणे उद्योजिका पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार कोण असेल याबद्दल जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगनाला भाजपने लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. तसंच अरुण गोविल यांनाही तिकिट देण्यात आलं आहे. मेरठमधून अरुण गोविल निवडणूक लढणार आहेत. रामायण मालिकेत रामाची भूमिका करुन घराघरांत पोहचलेले अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत.
कंगना राणावतची प्रतिक्रिया:
भारत आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंवर माझं प्रेम आहे. मला भाजपाकडून कायमच पाठिंबा मिळाला आहेत. आज भाजपाने माझं नाव लोकसभेची उमेदवार म्हणून जाहीर केलं. माझं जन्मस्थळ असलेल्या हिमाचलच्या मंडी या ठिकाणाहून मला उमेदवारी देण्यात आली आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा बहुमान. मी एक चांगली कार्यकर्ता होईन आणि लोकसेवेसाठी काम करेन या आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे.